- ऋजुता लुकतुके
आशिया चषक (Women’s Asia Cup 2024) टी-२० स्पर्धेत भारतीय महिलांनी त्यांची अव्वल कामगिरी कायम राखली आहे. उपांत्य फेरीत बांगलादेशी महिलांचा १० गडी राखून पराभव करत त्यांनी अंतिम फेरीत धडक दिली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने आतापर्यंतचे सर्व सामने वर्चस्व राखत निर्विवादपणे जिंकले आहेत. उपांत्य फेरीत बांगलादेशला त्यांनी आधी ८० धावांतच रोखलं. त्यानंतर १० गडी आणि ५४ चेंडू राखून त्यांनी हा सामना जिंकला. (Women’s Asia Cup 2024)
(हेही वाचा- Mumbai Local Megablock: घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा!)
बांगलादेशची (Bangladesh) कर्णधार निगार सुलतानाने (Nigar Sultana) ३२ धावा केल्या. ती वगळता इतर एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकली नाही. शोरना अख्तरने १९ धावा केल्या. बाकीच्या फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकल्या नाहीत. त्यामुळे बांगलादेशचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद ८० धावाच करू शकला. भारताकडून राधा यादव (Radha Yadav) आणि रेणुका सिंग (Renuka Singh) यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. (Women’s Asia Cup 2024)
बांगलादेशने समोर ठेवलेलं हे आव्हान भारतीय महिलांनी ११ षटकांतच पूर्ण केलं.
India’s women cricketers continue their global domination.
Congratulations for the superb win against Bangladesh in the semi final. Your talent, teamwork and commitment are exemplary. Best wishes for the final. #WomensAsiaCup2024 pic.twitter.com/lejg80QLbX
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) July 26, 2024
स्मृती मंढाना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shafali Verma) यांनी भारतीय डावाला वेगवान सुरुवात केली. बांगलादेशच्या फलंदाजीच्या वेळी धिमी वाटणारी खेळपट्टी अचानक सोपी वाटायला लागली. स्मृतीने ३९ चेंडूंत नाबाद ५५ धावा करताना १ षटकार आणि ९ चौकार ठोकले. तर शेफालीनेही नाबाद २५ धावा केल्या. बरोबर अकरावं षटक संपताना भारतीय महिलांनी सामना संपवला. (Women’s Asia Cup 2024)
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा रंगारंग उद्घाटन सोहळा, फ्रान्सची फॅशन आणि क्रीडा यांचा मिलाफ)
आता अंतिम फेरीत भारतीय महिलांची गाठ श्रीलंकेशी पडणार आहे. श्रीलंकन महिलांनी अगदी अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानी महिलांचा ३ गडी राखून पराभव केला आहे. भारतासाठी ४ षटकांत १० धावा देत ३ बळी मिळवणारी रेणुका सिंग सामनावीर ठरली. (Women’s Asia Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community