- ऋजुता लुकतुके
३ बाद ५२ अशा अवस्थेतून सावरत ५ बाद २०१ धावांचा डोंगर आणि मग निर्धारित २० षटकांत युएईची ७ बाद १२३ अशी अवस्था करत भारतीय महिलांनी या सामन्यात ७८ धावांनी मोठा विजय मिळवला. सामन्यावर पूर्णवेळ भारतीय महिलांचंच वर्चस्व राहिलं. कारण, पॉवरप्लेमध्ये भारताने ३ फलंदाज गमावले असले तरी षटकामागे ११ ची धावगती राखत तेव्हाच त्यांनी ५५ धावाही केल्या होत्या. त्यानंतर जेमतेम शंभरीत संयुक्त अरब अमिरातीचे ६ बळी मिळवत सामन्यात विजयही त्यांनी झटपट पक्का केला. (Women’s Asia Cup 2024)
(हेही वाचा- Konkan Railway: गणेशोत्सवाची तिकिटे फुल्ल; १ मिनिटात प्रतीक्षा यादी ७०० पार!)
या विजयाबरोबरच भारतीय संघाने उपान्त्य फेरीचे दरवाजेही खुले केले आहेत. सलामीवीर शेफाली वर्माने १२ चेंडूंत ३७ धावा करत सुरुवात चांगली केली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने ६६ तर रिचा घोषने नाबाद ६४ धावा करत भारताची धावसंख्या दोनशेच्या पार नेली. रिचाने ६६ धावा केल्या त्या २९ चेंडूंत. १ षटकार आणि १४ चौकारांच्या सहाय्याने. सातव्या क्रमांकावर आलेल्या रिचाने क्रिकेटमधील पारंपरिक फटके खेळत वेगाने धावा वाढवल्या. (Women’s Asia Cup 2024)
For her blistering counter-attacking knock of 64* off 29 balls, @13richaghosh is named the Player of the Match 👏
Scorecard ▶️ https://t.co/fnyeHav1sS#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvUAE pic.twitter.com/YAOm2a9gDA
— BCCI Women (@BCCIWomen) July 21, 2024
हरमनप्रीत (Harmanpreet) आणि ऋचा घोष (Richa Ghosh) यांनी सहाव्या गड्यासाठी ७५ धावांची भागिदारीही केली. त्याच्या जोरावर भारतीय महिलांनी निर्धारित २० षटकांत ६ बाद २०१ धावा केल्या. नवख्या संयुक्त अरब अमिरातीसाठी ही धावसंख्या मोठीच ठरणार होती. त्यातच सुरुवातीपासून फलंदाज बाद होत गेल्यामुळे त्यांची अवस्था ३ बाद ३६ अशी बिकट झाली. (Women’s Asia Cup 2024)
(हेही वाचा- Amit Shah यांची आधी शरद पवारांवर कडाडून टीका; आज Ajit Pawar यांना फोन)
युएईसाठी सलामीवीर ईशा ओझाने (Isha Ojha) ३८ तर कविशाने नाबाद ४० धावा केल्या. त्यामुळे त्यांनी निदान १२० चा टप्पा ओलांडला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ४० धावांची भागिदारी केली. पण, ती धिमी होती. त्यामुळे संघ विजयाच्या जवळ कधीच जाऊ शकला नाही. अखेर २० षटकांत ७ बाद १२३ एवढीत मजल युएईचा महिला संघ गाठू शकला. महिला क्रिकेटमध्ये ५ बाद २०१ ही टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या आहे. (Women’s Asia Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community