- ऋजुता लुकतुके
अलीकडे एका महिन्यात भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) हे पारंपरिक प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर तीनदा आमने सामने आले. यातील दोनदा पुरुष संघाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला होता. आता आशिया चषकाच्या टी-२० सामन्यात भारताच्या महिला संघाने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेत दंबुला इथं झालेल्या सामन्यात पाकिस्तानने पहिली फलंदाजी करताना १०८ धावा केल्या. मग ही धावसंख्या भारताने ७ गडी आणि ३५ चेंडू राखून पार केली. (Women’s Asia Cup 2024)
आधी पाक महिलांना १०८ धावांत गुंडाळण्याचं काम दीप्ती शर्मा (२० धावांत ३), रेणुका सिंग (१४ धावांत २) आणि पूजा वस्त्रकार (३१ धावांत २) यांनी केलं. पाकिस्तानकडून सिद्रा अमिनने सर्वाधिक २५ धावा केल्या. तुबा हसन, फातिमा साना आणि मुनिबा अली यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. खेळपट्टी पाहता हे आव्हान लहानच होतं. (Women’s Asia Cup 2024)
For her fine bowling display, Deepti Sharma bagged the Player of the Match award as #TeamIndia sealed a dominating win over Pakistan 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/30wNRZNiBJ#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvPAK | @Deepti_Sharma06 pic.twitter.com/7lvnSJNlFt
— BCCI Women (@BCCIWomen) July 19, 2024
(हेही वाचा – Kia Sportage : कियाची नवीन क्रॉसओव्हर सी सेगमेंट एसयुव्ही आली जगासमोर)
त्यातच शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी ८५ धावांची सलामी देत सामन्यातील चुरसच घालवून टाकली. शिवाय भारताची धावगतीही षटकामागे ९ अशी आक्रमक होती. त्यामुळे पहिल्या ५ षटकांतच पाकिस्तानचा पराभव स्पष्ट झाला. शेफालीने ४० तर स्मृतीने ४५ धावा केल्या. त्यानंतर हरमनप्रीत आणि जेमिमा रॉडरिग्जने नाबाद राहत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. (Women’s Asia Cup 2024)
४ षटकांत २० धावा देत ३ बळी टिपणारी दीप्ती शर्मा सामनावीर ठरली. चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा पुढील सामना रविवारी संयुक्त अरब अमिराती संघाबरोबर होणार आहे. गटातील तीन पैकी दोन सामने जिंकले तर भारतीय संघ (Indian Team) उपांत्य फेरी गाठू शकेल. (Women’s Asia Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community