Women’s Asian Champions Trophy : आशियाई विजेतेपदानंतर भारतीय महिला हॉकी संघाने असा साजरा केला विजय

Women’s Asian Champions Trophy : महिलांनी या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. 

62
Women’s Asian Champions Trophy : आशियाई विजेतेपदानंतर भारतीय महिला हॉकी संघाने असा साजरा केला विजय
  • ऋजुता लुकतुके

भारतीय महिला हॉकी संघ यंदा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला नव्हता. अर्थातच, हे अपयश संघाला बोचत होतं. त्यामुळेच संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना जेमतेम यावर्षी आपलं प्रशिक्षक पद कायम राखता आलं होतं. पण, आता महिला हॉकी संघाने या अपयशाचा थोडाफार बदला घेतला आहे आणि बुधवारी महिला आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत विजेतेपद पटकावत आपली तयारी दाखवून दिली आहे. अंतिम फेरीत महिलांनी चीनचा १-० ने पराभव केला. अख्ख्या स्पर्धेत सातत्याने गोल करणारी दीपिका या सामन्यातही प्रभावी ठरली. स्पर्धेतील आपला ११ वा गोल करत तिने भारताला विजय मिळवून दिला. महत्त्वाचं म्हणजे साखळी सामन्यातही भारताने चीनचा १-० ने पराभव केला होता.

विजयानंतर महिला संघाने केलेला जल्लोष पाहता या विजयाची आस त्यांना किती होती याची कल्पना येते. प्रशिक्षक हरेंद्र सिंगही खेळाडूंच्या नृत्यात सहभागी झाले होते. (Women’s Asian Champions Trophy)

(हेही वाचा – दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाविरोधातील याचिका Mumbai High Court कडून निकाली)

महिला आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत भारताने मिळवलेलं हे तिसरं विजेतेपद आहे. यापूर्वी २०१६ आणि २०२३ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. संघाचं हे सलग दुसरं विजेतेपद आहे. अलीकडे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र न ठरल्यामुळे महिला हॉकी संघाविषयी देशात नाराजी होती. ते अपयश थोडंफार का होईना संघाने भरून काढलं आहे. ऑलिम्पिकच्या अपयशानंतर हॉकी इंडियाने हरेंद्र सिंग यांना प्रशिक्षक पदाची जबाबदारी पुन्हा एकदा दिली. आणि त्यांनी पहिलं यश भारताला मिळवून दिलं आहे. (Women’s Asian Champions Trophy)

(हेही वाचा – Ind vs Pak Cricket : चॅम्पियन्स करंडकावर चर्चा सुरू असताना भारताचा पाकिस्तानला एक धक्का, ‘या’ स्पर्धेतून घेतली माघार)

भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी सध्या अनिश्चित आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये हा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला होता. पण, त्यानंतर कामगिरी अचानक इतकी घसरत गेली की, पॅरिस ऑलिम्पिकसाठी संघ पात्रही ठरू शकला नाही. त्यानंतर भारतीय संघ आता पुन्हा एकदा उभा राहत आहे. (Women’s Asian Champions Trophy)

बिहारच्या राजगीर इथं ही स्पर्धा पार पडली. बिहार सरकारने महिला संघातील प्रत्येक खेळाडूला १० लाख रुपये तर सपोर्ट स्टाफपैकी प्रत्येकाला ५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहेत. (Women’s Asian Champions Trophy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.