Women’s Day 2023 : ‘वुमन्स इन ब्लू’… महिला क्रिकेट WPL मुळे पोहोचणार घराघरात!

133

जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्चला साजरा करण्यात येतो. महिला आता प्रत्येक क्षेत्रात आपले स्वत:चे स्थान निर्माण करत आहेत. आपल्या ‘मेन्स इन ब्लू’प्रमाणे ‘वुमन्स इन ब्लू’ला सुद्धा देशभरातून प्रोत्साहन दिले जात आहे.

( हेही वाचा : Women’s Day 2023 : प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला महिलांना PMPML मधून करता येणार मोफत प्रवास)

महिला प्रिमियर लीगच्या माध्यमातून भारतीय महिला क्रिकेटला नवसंजीवनी मिळणार आहे अशी शक्यता क्रिकेट विश्वातून व्यक्त करण्यात येत आहे. WPL ऑक्शनमध्ये स्मृती मंधानाला सर्वाधिक ३.४ कोटींना रॉयस चॅलेंजर्स बंगलोरने आपल्या संघात सामावून घेतले आणि देशभरात महिला क्रिकेटची चर्चा सुरू झाली. स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावामध्ये भारतीय खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली.

“हरमन आली रे” आणि “जर्सी नंबर 18 in RCB” चा ट्रेंड 

मुंबई इंडियन्समध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचा समावेश झाल्यावर “हरमन आली रे” अशा आशयाने तिच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. काही मिनिटांमध्ये या व्हिडिओला लाखो व्ह्यूज गेले आणि हरमन घराघरात पोहोचली. त्यानंतर टी२० विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात हरमनची खेळी लोकांनी आवर्जून पाहिली आणि कर्णधार म्हणून तिची तुलना थेट महेंद्रसिंग धोनीसमवेत करण्यात आली. तसेच “जर्सी नंबर 18 in RCB” अर्थात विराट कायम १८ क्रमांकाची जर्सी परिधान करतो अगदी त्याचप्रमाणे स्मृती मंधाना सुद्धा १८ नंबर जर्सी परिधान करते, ती सुद्धा विराटप्रमाणे उत्कृष्ट बॅटर आहे असे अधोरेखित करत रॉयस चॅलेंजर्स बंगलोरने स्मृतीला फ्रॅंचायझीचे कर्णधार केले.

टी२० विश्वचषकाच्या आधी सर्वत्र WPL 2023 ची चर्चा रंगल्यामुळे यंदाच्या विश्वचषकाला जास्तीत नागरिकांनी पसंती दिली आणि आपल्या महिला टीमला प्रोत्साहन दिले. इतकेच नाहीतर सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यावरही देशभरातील क्रिकेटप्रेमी भारतीय महिला संघाच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले यावरून निश्चितच म्हणता येईल की, WPL मुळे महिला क्रिकेट घराघरात पोहोचणार आहे.

आपल्या सर्वांचा खेळ

WPL मधील ‘W’ हे अक्षर अधोरेखित करून ‘वी’ हा आपल्या सर्वांचा खेळ आहे असे देशवासीयांना कॅम्पिंग करून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघात खेळणाऱ्या महिला खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन आता घरोघरी पालक आपल्या मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन करतील असा आशय WPL मधून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ICC ने समान वेतन देण्याचा निर्णय घेतल्यावर आता WPL मुळे खऱ्या अर्थाने महिलांना क्रिकेटमध्ये नव्या संधी निर्माण होऊन आपल्या देशात भावी स्मृती, हरमन, दिप्ती, झुल्लन गोस्वामी तयार होतील.

प्रमुख महिला खेळाडू

  • स्मृती मंधाना- ३.४ कोटी – रॉयस चॅलेंजर्स बंगलोर
  • हरमनप्रीत कौर – १.८ कोटी – मुंबई इंडियन्स
  • सोफी डिव्हाईन – ५० लाख – रॉयस चॅलेंजर्स बंगलोर
  • अ‍ॅशलेह गार्डनर – ३.२ कोटी – गुजरात जायंट्स
  • एलिस पेरीला – १.७ कोटी – रॉयस चॅलेंजर्स बंगलोर
  • सोफी एक्लेस्टोन – १.८ कोटी – युपी वॉरियर्स
  • दिप्ती शर्मा – २.६ कोटी – युपी वॉरियर्स
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.