Women’s Hockey Coach : महिलांच्या राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाचे मुख्य दावेदार हरेंद्र सिंग

Women's Hockey Coach : २०२१ च्या आधी हरेंद्र सिंग महिला संघाचे प्रशिक्षक राहिलेले आहेत. 

190
Women's Hockey Coach : महिलांच्या राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाचे मुख्य दावेदार हरेंद्र सिंग
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून हरेंद्र सिंग यांच्याच नावाला पसंती मिळेल अशी लक्षणं आहेत. महिला संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाहीए. त्यामुळे संघात सध्या निराशेचं वातावरण आहे. सध्याचे प्रशिक्षक जेनेक शॉपमन यांची गच्छंती अटळ आहे. आणि हरेंद्र सिंगच अशा मरगळलेल्या संघाला नवसंजीवनी देऊ शकतात असं हॉकी इंडियाला वाटतं. हरेंद्र सिंग बरोबर हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली आहे. (Women’s Hockey Coach)

हरेंद्र सिंग यांनी यापूर्वी २०२१ पर्यंत काही काळ महिला संघाला प्रशिक्षण दिलं आहे. त्यानंतर ते अमेरिकन राष्ट्रीय पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून मागची ३ वर्षं अमेरिकेत होते. पण, संघातील खेळाडूंना ते जवळून ओळखतात. आणि प्रशिक्षणाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. ‘जेनेक यांच्या जागी हरेंद्र सिंग यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यांनी महिला आणि पुरुषांच्या संघालाही यापूर्वी प्रशिक्षण दिलं आहे. आणि त्यांचा रेकॉर्ड चांगला आहे. भारतीय महिला संघाला जुने दिवस पुन्हा दाखवायची क्षमता त्यांच्याकडे आहे,’ असं हॉकी इंडियातील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. हॉकी इंडियाने या पदासाठी ११ ते १२ जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आणि त्यातून एका उमेदवाराची निवड करण्यात येईल, असं हॉकी इंडियाचे सरचिटणिस भोलानाथ सिंग यांनी पीटीआयला सांगितलं आहे. (Women’s Hockey Coach)

(हेही वाचा – New Model Patch Work Blouse Designs : ब्लाऊजचे ‘हे’ आकर्षक पॅटर्न पाहिलेत का ?)

हरेंद्र सिंग सध्या अमेरिकन संघाबरोबर आहेत. आणि तिथे त्यांना मिळणारा मोबदला ही एक अडचण त्यांच्या नेमणुकीमध्ये येऊ शकते. कारण, क्रीडा मंत्रालायाने घालून दिलेल्या नियमांनुसार, कुठल्याही खेळाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकाला महिना ३ लाख रुपयांपेक्षा जास्त मोबदला देता येत नाही. पण, हरेंद्र सिंग यांना अमेरिकन हॉकी फेडरेशनकडून यापेक्षा कितीतरी जास्त मोबदला सध्या मिळत आहे. आणि हरेंद्र सिंग यांनी हॉकी इंडियाकडून जास्त मोबदल्याची अपेक्षा आहे. सध्या या वाटाघाटीच सुरू असल्याचं समजतंय. (Women’s Hockey Coach)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.