Women’s Premier League : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर मुलींसह पुरुष संघाचाही जल्लोष

39
Women's Premier League : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर मुलींसह पुरुष संघाचाही जल्लोष

मुंबई इंडियन्स महिला संघाने वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. ब्रेबॉर्न स्टेडियमवर शनिवारी (१५ मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्स संघाला ८ धावांनी पराभव करत दुसऱ्यांना विजेतेपदावर नाव कोरले. दरम्यान या अंतिम सामन्यासाठी मुंबई इंडियन्स पुरुष संघातील अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.मुंबई इंडियन्स महिला संघाने विजय मिळवताच मुंबई इंडियन्स पुरुष संघांचे खेळाडूंनीही मोठा जल्लोष केला. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. (Women’s Premier League)

२०२३ मध्ये जेव्हा मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली होती, त्यावेळीही त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघालाच पराभवाचा धक्का दिला होता आणि तो अंतिम सामनाही ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला होता.आता पुन्हा एकदा याच मैदानावर मुंबई इंडियन्स विजय मिळवला आहे. आयपीएल २०२५ स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत असल्याने मुंबई इंडियन्स पुरुष संघातील अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य मुंबईत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी या अंतिम सामन्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. ज्या क्षणी मुंबई इंडियन्सच्या महिला संघाचा विजय निश्चित झाला, तेव्हा त्यांनीही मोठा जल्लोष केला. तिलक वर्मा, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ड, कायरन पोलार्ड, कर्ण शर्मा असे अनेक मुंबई इंडियन्सचे खेळाडू जल्लोष करताना दिसत आहेत. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. (Women’s Premier League)

(हेही वाचा – Pune येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान 23 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी !)

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. सर्व खेळाडू सामन्यानंतर एकत्र गोलाकार जमल्या होत्या. मध्ये संघमालकीण नीता अंबानी उभ्या होत्या. ते सर्व मिळून मुंबई इंडियन्स… मुंबई इंडियन्स… असा जयघोष करत होते.तसेच खेळाडूंनी एकमेकांचे अभिनंदनही केले. सामन्यानंतर नीता अंबानी यांनी म्हटले की ‘माझ्या मुलींवर माझा विश्वास होता. त्यांना संघातील सर्वांडून सातत्याने प्रोत्साहन दिले जात होते. मुलींना प्रोत्साहन दिले की त्या काय करू शकतात हे त्यांनी दाखवले आहे.’ (Women’s Premier League)

मुंबईला २० षटकात ७ बाद १४९ धावा करता आल्या. त्यानंतर गोलंदाजांनी ही धावसंख्या निर्णायक ठरवली. दिल्ली संघाला नऊ बाद १४१ धावांत रोखले.दिल्लीकडून मारिझान कापने ४० धावांची झुंज दिली. मुंबईकडून नतालियाने फलंदाजी करताना हरमनप्रीतबरोबर ८९ धावांची भागीदारी केली होती. तिने नंतर गोलंदाजीतही भरीव योगदान दिले. नतालियाने ३ विकेट्सही घेतल्या. नतालिया या वूमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामातील सर्वात्तम खेळाडू देखील ठरली. तसेच ती ऑरेंज कॅपचीही मानकरी ठरली. तिने १० सामन्यांत सर्वाधिक ५२३ धावा ठोकल्या. तसेच १२ विकेट्स देखील तिने घेतल्या. (Women’s Premier League)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.