-
ऋजुता लुकतुके
महिला प्रमिअर लीग सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बीसीसीआयने लीगचे सामने चार शहरांमध्ये घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे देशातील तीन नवीन शहरांपर्यंत ही लीग पोहोचू शकेल. यंदा फेब्रुवारी महिन्यात ही लीग खेळवली जाणार असून सामने मुंबई, लखनौ, बंगळुरू आणि बडोदे इथं खेळवले जाण्याची शक्यता आहे. २३ सामन्यांचा हा हंगाम ६ फेब्रुवारीला सुरू होईल. आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपेल असा अंदाज आहे. (Women’s Premier League)
(हेही वाचा- Maha Kumbh Mela 2025 : तीर्थराज प्रयागला येऊन मनुष्यजीवनाचे सार्थक करा; महंत अनिकेतशास्त्री यांचे आवाहन)
‘यंदा स्पर्धचे चार टप्पे असतील. आणि ते चार शहरांमध्ये घेण्याचा बीसीसीआयाच विचार आहे. पहिला टप्पा मुंबईत होईल. आणि चौथा टप्प्यासह अंतिम सामना बडोदे इथं कोटांबी स्टेडिअमवर रंगेल. हे स्टेडिअम नवीन बांधून तयार झालं आहे. आणि तिथे हा अंतिम सामना होऊ शकेल,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. (Women’s Premier League)
कोटांबी स्टेडिअममध्ये यापूर्वी महिलांचे आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. इथंच गेल्यावर्षी भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला अशी एकदिवसीय मालिका पार पडली होती. तर रणजीचे काही सामनेही या स्टेडिअमवर झाले आहेत. आणि विजय हजारे स्पर्धेची बाद फेरीही इथेच रंगत आहे. (Women’s Premier League)
डब्ल्यूपीएल ही पाच संघांमध्ये खेळवली जाते. यंदा स्पर्धेचा तिसरा हंगाम असेल. दोन वर्षांपूर्वी पहिला वहिला हंगाम हा मुंबईत डी वाय पाटील स्टेडिअम आणि ब्रेबॉर्न स्टेडिअमवर रंगला होता. तर दुसरा हंगाम बंगळुरू आणि दिल्ली इथं दोन टप्प्यात झाला होता. बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाने गेल्यावर्षी ही स्पर्धा जिंकली होती. (Women’s Premier League)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community