महिला टी20 वर्ल्ड कप २०२३ साठी हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचे नेतृत्व असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी सायंकाळी महिला संघाची घोषणा केली. विश्वचषकासोबतच ट्राय सिरीजसाठीच्या संघाचीदेखील निवड करण्यात आली आहे. भारत, वेस्ट विंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ट्राय सिरिज होणार आहे. १० फेब्रुवारीपासून महिला टी 20 विश्वचषक, तर १९ जानेवारीपासून ट्राय सिरीज सुरू होणार आहे.
विश्वचषकात ग्रुप २ मध्ये भारतीय संघ
वर्ल्डमध्ये भारतीय संघ ग्रुप २ मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारतीय संघासोबत इंग्लंड, वेस्ट विंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघाचा सामना आहे. दोन्ही ग्रुपमधील आघाडीच्या दोन संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. १० फेब्रुवारी रोजी विश्वचषकाला सुरुवात, तर २६ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना होणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1608117134848319488?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1608117134848319488%7Ctwgr%5Eab3f5e29dd448b211fa0600bed61e14fe71ca401%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fsocially%2Fsports%2Findian-squad-announced-for-womens-t20-world-cup-2023-and-tri-series-in-south-africa-428230.html
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), ऋचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकुर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे यांचा समावेश आहे. तर राखीव खेळाडूंमध्ये सब्भीनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंह या असतील.
( हेही वाचा: टीम इंडियाला मिळणार नवा यष्टीरक्षक? श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून ऋषभ पंतचे नाव वगळले )
वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक
- पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध १२ फेब्रुवारी: केप टाऊन,
- दुसरा सामना वेस्ट विंडिज विरुद्ध १५ फेब्रुवारी: केप टाऊन,
- तिसरा सामना इंग्लंड विरुद्ध १८ फेब्रुवारी : पोर्ट एलिजाबेथ,
- चौथा सामना आयर्लंड विरुद्ध २० फेब्रुवारी : पोर्ट एलिजाबेथ
ट्राय सिरीजसाठी भारतीय संघात हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका ठाकुर, मेघना सिंह, अंजली सरवानी, शुष्मा वर्मा (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, सब्भीनेनी मेघना, स्नेह राणा, शिखा पांडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community