-
ऋजुता लुकतुके
टी-२० महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांना सलामीलाच पराभवाची चव चाखावी लागली. न्यूझीलंड संघाने भारताचा ५२ धावांनी पराभव केला. विजयासाठी १६२ धावांची गरज असताना महिला संघ १०२ धावांतच ढेपाळला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही भारतीय संघ खूपच मागे होता. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून न्यूझीलंड संघाने वर्चस्व मिळवलं होतं. आधी सूझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी संघाला ६७ धावांची सलामी करून दिली. त्यानंतर कर्णधार सोफी डिव्हाईनने ५७ धावा करत न्यूझीलंडच्या धावसंख्येला आकार दिला. (Women’s T20 World Cup 2024)
(हेही वाचा- PM Narendra Modi करणार मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचं उद्धाटन, अशी आहे मेट्रो- ३)
या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेल सोडले. तर क्षेत्ररक्षणातही ढिलाई दाखवली. त्यामुळे न्यूझीलंडला १५० धावांचा टप्पा ओलांडणं सोपं गेलं. रेणुका सिंगने (Renuka Singh) २७ धावांत २ बळी मिळवले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) संघाच्या कामगिरीवर नाराज होती. (Women’s T20 World Cup 2024)
New Zealand win Match 4⃣ of the #T20WorldCup.#TeamIndia will aim to bounce back in the next game.
Scorecard ▶️ https://t.co/XXH8OT5MsK#INDvNZ | #WomenInBlue pic.twitter.com/DmzOpOq87g
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024
त्यानंतर भारतीय महिलांनी फलंदाजीतही हाराकिरी केली. संथ खेळपट्टीवर मोठे फटके खेळण्याच्या नादात बळी जात राहिले. अगदी दुसऱ्या षटकापासून फलंदाज बाद होत गेले. सगळ्यात आधी शेफाली शर्मा (shefali sharma) २ धावांवर बाद झाली. पाठोपाठ स्मृती मंढाणाही (Smriti Mandhana) १२ धावा करून बाद झाली. त्यानंतर भारतीय फलंदाजी कधी रुळावरच आली नाही. हरमनप्रीत, जेमिमा रॉडरिग्ज, रिचा घोष, दीप्ती शर्मा आणि अरुंधती रेड्डी या सगळ्याच झटपट बाद होत गेल्या. त्यामुळे ७५ धावांतच भारतीय संघाचे ६ फलंदाज तंबूत परतले आहेत. (Women’s T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Non-Agricultural Tax: राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ)
अखेर भारतीय संघ १०२ धावांत गुंडाळला गेला. किवी कर्णधार सोफी डिवाइनने (Sophie Devine) ५७ धावांबरोबरच ३ झेलही टिपले. तिलाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाचा पुढील सामना ६ ऑक्टोबरला पाकिस्तानबरोबर आहे. (Women’s T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community