Women’s T20 World Cup 2024 : भारत – न्यूझीलंड सामन्यात अमेलिया केरला धावचीत का दिलं गेलं नाही?

47
Women’s T20 World Cup 2024 : भारत - न्यूझीलंड सामन्यात अमेलिया केरला धावचीत का दिलं गेलं नाही?
Women’s T20 World Cup 2024 : भारत - न्यूझीलंड सामन्यात अमेलिया केरला धावचीत का दिलं गेलं नाही?Women’s T20 World Cup 2024 : भारत - न्यूझीलंड सामन्यात अमेलिया केरला धावचीत का दिलं गेलं नाही?
  • ऋजुता लुकतुके 

महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात वर्चस्व न्यूझीलंडचंच होतं. त्यांनी सामनाही ५८ धावांनी जिंकला. पण, एरवी न्यूझीलंडचा डाव सुरू असताना सामन्यात एक वादग्रस्त प्रसंगही आला. अमेलिया केर ही न्यूझीलंडची फलंदाज क्रीझमध्ये पोहोचण्यापूर्वीच भारतीय खेळाडूंनी यष्टीचा वेध घेतलेला होता. पण, तरीही मैदानावरील पंचांनी केरला नाबाद ठरवलं. १४ व्या षटकात हा प्रसंग घडला. षटकातील शेवटच्या चेंडूवर केरने चेंडू लाँगऑनला फटकावला. हरमनप्रीत कौरने चेंडू अडवला. रिचा घोषकडे चेंडू देण्यापूर्वी हरमनप्रीतने एक-दोन पावलं नुसती धाव घेतली. त्या वेळेत न्यूझीलंडची फलंदाज सोफी डिव्हाईनने दुहेरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला. तिने दुसऱ्या बाजूने धाव घेतलीही. हरमनप्रीतने रिचा घोषकडे चेंडू फेकला. रिचाने यष्टी उडवली. तेव्हा अमेलिया केर क्रीझमध्ये पोहोचली नव्हती. (Women’s T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Sachin Kurmi: अजित पवार गटातील नेते सचिन कुर्मी यांची हत्या! हल्लेखोराचा शोध सुरू)

भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केलं. पण, पंचांनी दुसरी धावही दिली नाही. अमेलिया केरला बादही दिलं नाही. भारतीय कर्णधार हरमनप्रीतने पंचांबरोबर यासाठी वादही घातला. पण, पंचांनी बाद दिलं नाही. (Women’s T20 World Cup 2024)

पंचांनी पहिली धाव पूर्ण झाल्या झाल्या षटक संपल्याचं जाहीर करून गोलंदाज दीप्ती शर्माला (Deepti Sharma) टोपी देऊनही टाकली होती. स्वत: फलंदाज अमेलिया केर तंबूत परत निघाली होती. पण, मैदानावरील पंच ॲना हॅरिस (Anna Harris) आणि जॅकलिन विल्यम्स (Jacqueline Williams) यांनी तिला थांबवलं. त्यांच्यामते हा चेंडू डेड बॉल होता. त्यामुळे हनमनप्रीतची टीव्ही रिव्ह्यूची मागणीही त्यांनी फेटाळली. (Women’s T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Earthquake: नवापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)

क्रिकेटमधील डेडबॉलचा नियम पुढील प्रमाणे आहे

२०.१.२ – गोलंदाजाच्या बाजूला उभा असलेल्या पंचांसाठी, क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि दोन्ही फलंदाज यांनी चेडू खेळवणं बंद केलं की, तो डेड होतो.

२०.२ – चेंडू डेड झाली की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार मैदानावरील पंचांचा असेल

२०.३ – एकदा चेंडू डेड झाल्यानंतर मगच षटक किंवा तो चेंडू संपल्याचं जाहीर करता येतं

२०.४.१ – गोलंदाजाकडे उभा असलेला पंच चेंडू डेड असल्याची खूण मैदानात करतात

या प्रसंगानंतर मैदानावर बराच काळ तावातावाने चर्चा होतच राहिली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानातील पंचांशी वाद घालताना दिसली. तर भारतीय संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदारही (Amol Muzumdar) टीव्ही पंचांशी या निर्णयावर बराच वेळ बोलले. किवी फलंदाज दुसरी धाव घेताना बघून आपण चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकण्याचा निर्णय घेतला असं हरमनप्रीत सांगत राहिली. तरीही मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलला नाही. अमेलिया केर फलंदाजी करत राहिली. अखेर ती १७ धावांवर बाद झाली.  (Women’s T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.