-
ऋजुता लुकतुके
भारताच्या महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकात पहिला विजय नोंदवताना पाकिस्तानी महिलांचा ६ गडी राखून पराभव केला. विजयासाठी आवश्यक १०६ धावा त्यांनी १९ व्या षटकांत पूर्ण केल्या. दिसताना हा विजय सोपा दिसत असला तरी दुबईच्या कडकडीत उन्हात आणि मंद खेळपट्टीवर भारताला खासे प्रयत्न करावे लागले. पण, भारतीय गोलंदाजांनी निम्मं काम सुरुवातीच्या २० षटकांतच केलं होतं. सलामीवीर गुल फिरोझा पहिल्याच षटकात बाद झाली. त्यानंतर सिद्रा अमीन आणि ओमेमा सोहेलही झटपट बाद झाल्या. पाक फलंदाजांना त्यानंतर लयच सापडली नाही. निदा दरच्या २८ धावा हाच त्यांचा रविवारचा उच्चांक. त्यामुळे निर्धारित २० षटकात पाक महिला ८ बाद १०५ इतकीच मजल मारू शकल्या. (Women’s T20 World Cup)
(हेही वाचा- Nashik Accident : कसारा घाटात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी)
भारताकडून अरुंधति रेड्डीने (Arundhati Reddy) १९ धावांत ३ तर श्रेयांका पाटीलने (Shreyanka Patil) १८ धावांत २ गडी बाद केले. त्यानंतर भारतीय डाव सुरू झाला तेव्हा खेळपट्टी मंदच होती. पण, सलामीवीर शफाली वर्माने (Shafali Verma) ३२ धावा करत एक बाजू लावून धरली. तिला हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) (२९) आणि जेमिना रॉडरिग्ज (२३) यांनीही तिला चांगली साथ दिली. त्यामुळे १९ व्या षटकात भारताला विजय साध्य करता आला. (Women’s T20 World Cup)
For her economical match-winning three-wicket haul, Arundhati Reddy receives the Player of the Match award 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/eqdkvWWhTP#TeamIndia | #T20WorldCup | #INDvPAK | #WomenInBlue pic.twitter.com/CxjjjAf0yG
— BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2024
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवानंतर हा विजय भारतीय महिलांसाठी महत्त्वाचा होता. आता या विजयामुळे महिलांनी स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलं आहे. सध्या ए गटात भारतीय महिला २ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंड विरुद्धचा पराभव ५८ धावांनी झाल्यामुळे त्यांची धावगती कमी आहे. अशावेळी आता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला विजय आवश्यक असेल. तो ही मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. (Women’s T20 World Cup)
(हेही वाचा- सरपंच महिलेस पदावरून हटवल्याची Supreme Court कडून गंभीर दखल; म्हणाले…)
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा विजय आव्हानात्मक असेल. पण, तो सामना जिंकला आणि दुसरीकडे, न्यूझीलंडनेही ऑस्ट्रेलियाला हरवलं तर भारत आणि न्यूझीलंडचे संघ उपान्त्य फेरीत पोहोचू शकतील. पण, ऑस्ट्रेलियाने आपले तीनही सामने जिंकले तर पाकिस्तान आणि श्रीलंकेनं न्यूझीलंडला हरवावं अशी प्रार्थना भारताला करावी लागेल. तरंच भारताला उपान्त्य फेरी गाठता येईल. (Women’s T20 World Cup)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community