- ऋजुता लुकतुके
भारतीय महिला संघाने रविवारी पाकिस्तान विरुद्ध ६ गडी राखून महत्त्वपूर्ण विजय मिळवला. या विजयाबरोबरच स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलं. संघाच्या विजयाचा साक्षीदार होता तो भारतीय संघातील स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह. सगळ्यांसाठीच हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. भारतीय खेळाडूंची त्याने भेट घेतलीच. शिवाय भारतीय धावसंख्या ११ व्या षटकात १ बाद ५४ अशी असताना त्याने टीव्हीवरही दर्शन दिलं. (Women’s T20 World Cup)
ध्यानीमनी नसताना बुमराह टीव्हीच्या पडद्यावर आल्यामुळे सगळ्यांचंच लक्ष काही काळ सामन्यापासून दूर गेलं. मैदानावरही बुमरासाठी जल्लोष सुरू झाला. भारतीय महिलांनी हा सामना ६ गडी राखून जिंकला. तोपर्यंत बुमरा मैदानावर हजर होता. (Women’s T20 World Cup)
Jasprit Bumrah in the stadium to support Indian Women’s team in the World Cup 🇮🇳 pic.twitter.com/b5jyZ0t14R
— Johns. (@CricCrazyJohns) October 6, 2024
(हेही वाचा – Maha Kumbh 2025 च्या लोगोचे योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अनावरण; भाविकांना असा होणार फायदा)
दुबईच्या धिम्या खेळपट्टीवर आधी भारतीय महिलांनी पाकिस्तानी संघाला ८ बाद १०५ धावांवर रोखलं. अरुंधती रेड्डीने ९ धावांत ३ बळी मिळवले. तर श्रेयांका पाटीलने १८ धावांत दोधांना बाद केलं. त्यानंतर १८.५ षटकांत भारतीय महिलांनी हे लक्ष्य ४ गडी गमावून पार केलं. यात कर्णधार हरमनप्रीतने २९ धावांचं योगदान दिलं. दुर्दैवाने हरमनप्रीतची मान दुखावल्यामुळे तिला मैदान सोडावं लागलं. पण, तिची तब्येत आता सुधारत असून ती पुढील सामना खेळणार असल्याचं समजतंय. (Women’s T20 World Cup)
ए गटात आता भारतीय संघ २ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला उर्वरित दोन सामने जिंकण्याबरोबरच इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. जसप्रीत बुमराहने या सामन्यात अरुंधती रेड्डीचं खास कौतुक केलं. खासकरून टी-२० मध्ये अरुंधतीने भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. २९ सामन्यात तिने २१ बळी मिळवले आहेत. (Women’s T20 World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community