Women’s T20 World Cup : आफ्रिकन महिलांचा ३२ धावांनी पराभव करत किवी महिलांना विजेतेपद 

Women’s T20 World Cup : आयसीसीच्या स्पर्धेत पुन्हा एकदा आफ्रिकन संघ उपविजेताच ठरला 

63
Women’s T20 World Cup : आफ्रिकन महिलांचा ३२ धावांनी पराभव करत किवी महिलांना विजेतेपद 
Women’s T20 World Cup : आफ्रिकन महिलांचा ३२ धावांनी पराभव करत किवी महिलांना विजेतेपद 
  • ऋजुता लुकतुके

महिलांच्या टी-२० विश्वचषकाला नवीन विजेता मिळाला आहे तो किवी महिलांच्या रुपाने. अंतिम फेरीत दर्जेदार खेळ करत त्यांनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवलं. दक्षिण आफ्रिकन महिलांचा ३२ धावांनी पराभव केला. विजयासाठी १५९ धावांच आव्हान असताना आफ्रिकन महिला ९ बाद १२६ धावाच करू शकल्या. महत्त्वाचं म्हणजे मोक्याच्या क्षणी, महत्त्वाच्या स्पर्धेत हाराकिरी करण्याचा लौकिक महिला संघानेही कायम ठेवला. पहिल्या जोडीने ५१ धावांची सलामी संघाला करून दिली होती. कर्णधार वॉलवार्ट चांगला जम बसून खेळत होती. पण, आधी ब्रिट्स १७ धावा करून आणि मग खुद्द कर्णधार ३३ धावा करून बाद झाल्या. १ बाद ५१ वरून संघ ९ बाद १२६ वर ढेपाळला. (Women’s T20 World Cup)

(हेही वाचा- Cyclone: बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ; ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार)

आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाने या संघाला पुन्हा एकदा हुलकावणी दिली. सामन्यातही आफ्रिकन गोलंदाजांनी जॉर्जिया प्लिमरला (Georgia Plimmer) (९) झटपट बाद करत सुरुवात चांगली केली होती. न्यूझीलंड संघाच्या तेव्हा फक्त १६ धावा झाल्या होत्या. पण, त्यानंतर किवी फलंदाजांनी डावावर वर्चस्व मिळवलं. (Women’s T20 World Cup)

सूजी बेट्स (Suzie Bates) (३३) आणि एमिली केर (४३) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ३७ धावांची भागिदारी केली. त्यानंतर ब्रूक हॅलीडेनं झटपट ३८ धावा करत धावसंख्या दीडशेच्या पार नेली. दुबईच्या धिम्या खेळपट्टीवर ही धावसंख्या तशी पुरेशीच वाटत होती. आफ्रिकन संघातून मायबाने २१ धावा देत २ बळी घेतले. (Women’s T20 World Cup)

 सुरुवातीचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आवश्यक धावगतीही वाढली होती. त्या नादातही फलंदाज बाद होत गेले. पण, २ बाद ५९ पासूम संघाची अवस्था ६ बाद ९७ अशी झाली. धावगती चांगलीच मंदावली. अखेर निर्धारित २० षटकांत आफ्रिकन संघ ९ बाद १२६ इतकीच मजल मारू शकला. ७ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.  (Women’s T20 World Cup)

(हेही वाचा- Mumbai University च्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; ‘हे’ आहे कारण)

न्यूझीलंडकडून रोझमेरी मेअरने २५ धावांत ३ तर एमिलिया केरने २४ धावांत ३ गडी बाद केले. ४३ धावा आणि ३ बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी करणारी एमिलिया केर सामनावीर ठरली. न्यूझीलंडने पहिल्यांदाच विश्वचषक विजेतेपद पटकावलं आहे. (Women’s T20 World Cup)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.