- ऋजुता लुकतुके
महिला टी-२० विश्वचषकाचे यंदाचे दावेदार आता ठरले आहेत. अंतिम फेरी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. दोघांनाही पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची संधी असेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा ८ धावांनी निसटता पराभव केला. सामना कमी धावसंख्येचा पण, चुरशीचा झाला. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली खरी. पण, निर्धारित २० षटकांत १२८ धावा करतानाच ९ बळी गेले तेव्हा वाटलं की, न्यूझीलंड बॅकफूटवर आहे. पण, धिम्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिज महिलांनाही हे आव्हान तितकंच कठीण गेलं आणि ८ धावा कमीच पडल्या.
न्यूझीलंडसाठी सूझी बेट्स (२६) आणि जॉर्जिया प्लिमर (३६) यांनी ४८ धावांची सलामी संघाला करून दिली. तेव्हा किवी संघ निदान दीडशे धावांचा पल्ला गाठेल असं वाटत होतं. पण, चांगल्या सुरुवातीनंतर नियमितपणे गडी बाद होत गेले. अखेर इझाबेला गेझने नाबाद २० धावा करत संधाला निदान १२० चा टप्पा ओलांडून दिला. वेस्ट इंडिजकडून डिएंड्रा डॉटिनने ४ गडी बाद केले. (Women’s T20 World Cup)
(हेही वाचा – काँग्रेस आणि उबाठामध्ये जागा वाटपावरून वाद सुरूच; Sanjay Raut म्हणाले…)
New Zealand are into the final with a thrilling win over West Indies 💪#T20WorldCup | #WIvNZ: https://t.co/VE75Yv7wAF pic.twitter.com/b2gznVHu2y
— T20 World Cup (@T20WorldCup) October 18, 2024
१२९ धावा जिंकण्यासाठी हव्या असताना वेस्ट इंडिजची सुरुवातच चांगली झाली नाही. मॅथ्यूज आणि जोसेफ यांनी निदान दुहेरी आकडा गाठला. त्यानंतर मधली फळी तर झटपट बाद झाली. डिएंड्रा डॉटिन अष्टपैलू कामगिरी करत ३३ धावा केल्या. तिने या खेळीत ३ षटकार लगावून विंडिजला विजयाच्या जवळ नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, ती सतराव्या षटकात बाद झाली. आणि दुसऱ्या बाजूनेही तिला साथ मिळाली नाही. अखेर निर्धारित २० षटकांत विंडिज संघ ८ बाद १२० धावाच करू शकला.
२९ धावांत ३ बळी टिपणारी एडन कार्सन सामनावीर ठरली. आता अंतिम फेरी रविवारी संध्याकाळी दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर रंगणार आहे. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकन महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. (Women’s T20 World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community