Women’s T20 World Cup : श्रीलंकेला ८२ धावांनी हरवून भारतीय महिलांनी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा केला आहे का?

Women's T20 World Cup : समजून घेऊया भारतीय महिलांचं टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचं गणित.

41
Women's T20 World Cup : श्रीलंकेला ८२ धावांनी हरवून भारतीय महिलांनी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा केला आहे का?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय महिलांनी टी-२० विश्वचषक स्पर्धेत (Women’s T20 World Cup) श्रीलंकेचा ८२ धावांनी पराभव करत आपल्या उपांत्य फेरीतील प्रवेशाला थोडंफार बळ दिलं आहे. कारण, पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून झालेला पराभव आणि त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला असला तरी धावगतीत फारसा फरक नसल्याचा बसलेला फटका यामुळे भारतीय महिलांचा उपांत्य फेरीचं गणित बिघडलं होतं. त्यातच गटात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा समावेश असल्यामुळे भारताचं आव्हान आणखी कठीण आहे.

अशावेळी श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने भारताला एक नवीन संधी मिळाली आहे. आता उपांत्य फेरीच्या दृष्टीने भारतासाठी नेमकं गणित काय आहे ते समजून घेऊया, ए गटात दोन विजयांसह भारताच्या खात्यात ४ गुण जमा आहेत. भारताचा शेवटचा साखळी सामना रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. गुण आणि त्यानंतर नेट रनरेटच्या आधारे संघांना आगेकूच करण्याची संधी असेल. (Women’s T20 World Cup)

(हेही वाचा – Ratan Tata Death : रतन टाटांच्या अंत्यविधी आणि अंत्ययात्रेच्या नियोजनासाठी बीएमसी, टाटा ट्रस्ट यांच्याकडून ‘असं’ आहे नियोजन)

  • भारतीय महिलांनी रविवारी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर त्यांचे ६ गुण होतील. पण, न्यूझीलंडने त्यांचे उर्वरित दोन सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला तर भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी ६ गुण होतील. आणि अशावेळी सरस धावगतीच्या आधारे पहिले दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
  • भारताने श्रीलंकेविरुद्ध दमदार विजय मिळवल्यामुळे भारताने पाकिस्तानला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं आहे. पण, पाकिस्तानने उर्वरित दोन सामने जिंकले तर त्यांना संधी आहे. अशावेळी ऑस्ट्रेलिया दोन पराभवांमुळे स्पर्धेबाहेर होईल. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. (Women’s T20 World Cup)
  • ऑस्ट्रेलियाने त्यांचे उर्वरित सगळे सामने जिंकले तर ते नक्कीच उपांत्य फेरीत पोहोचतील. पण, गटात असंही होऊ शकतं की, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान प्रत्येकी दोन विजयांसह ४ गुणांवर राहू शकतात. अशावेळी पुन्हा एकदा सरस धावगतीच्या आधारे उपांत्य फेरी गाठणारा संघ ठरेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.