भारतीय बॉक्सर नीतू घंघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. नीतू घंघासने ४८ किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुटसेखर अलतेंगसेंगचा पराभव केला. भारतीय बॉक्सर नीतूने हा सामना ५-० असा जिंकला. त्यापूर्वी शनिवारी नीतू घंघासने उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव केला होता.
दरम्यान अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच नीतू वर्चस्व गाजवताना दिसली. पहिल्याच फेरीत नीतूने ५-० जिंकल्यानंतर लुत्सेखानला दुसऱ्या फेरीत पुनरागमन करण्याची संधी दिलीच नाही. विरोधी बॉक्सरने अनेक प्रयत्न करून देखील नीतूने काही वर्चस्व करू दिले नाही. दुसरी फेरी नीतूने ३-२ अशी जिंकली. तसेच तिसऱ्या फेरीत लुत्सेखानच्या अटॅकपासून चांगल्याप्रकारे बचाव करून तिसरी फेरीही नीतूने जिंकली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर नीतू घंघास वर्ल्ड चॅम्पियन बनणारी सहावी भारतीय ठरली आहे.
https://twitter.com/ddsportschannel/status/1639611816421756929?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1639611816421756929%7Ctwgr%5Ec77d5df1e7780a3ca055d2ad0e5a90b3b715f762%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.hindustantimes.com%2Fsports%2Fnitu-ganghas-won-gold-medal-in-womens-world-boxing-championships-nikhat-zareen-nitu-ganghas-saweety-boora-and-lovlina-borgohain-141679749432023.html
नीतू घंघास हिच्यानंतर आता भारतीयांची नजर स्वीटी बुराकडे आहे. स्वीटी बुराने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. ८१ किलो वजनी गटात स्वीटी बुराने अंतिम सामन्यात धडक मारली असून नीतू घंघास नंतर स्वीटी भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक आणते का? याची उत्सुकता लागली आहे.
(हेही वाचा – प्रतिक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी)
Join Our WhatsApp Community