ऋजुता लुकतुके
तिरंदाजीत (World Archery Championship 2023) देशाला पहिलं वहिलं जागतिक अजिंक्यपद सुवर्ण जिंकून देणाऱ्या ज्योती वेन्नम, अदिती स्वामी आणि परणीत कौर या त्रिकुटाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) अभिनंदन केलं. तुमची मेहनत आणि समर्पण यामुळे हे यश शक्य झाल्याचं मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जर्मनीत बर्लिन इथं सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत (World Archery Championship 2023) कम्पाऊंड प्रकारात भारतीय महिलांनी ऐतिहासिक सुवर्ण जिंकलं. अंतिम फेरीत त्यांनी मेक्सिकोच्या संघाला 235 विरुद्ध 229 गुणांनी धूळ चारली. तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचं हे पहिलंच सुवर्ण पदक ठरलं. त्यामुळे ज्योती आणि तिच्या युवा संघाचं सगळीकडे कौतुक होतंय. त्यातच आता खुद्द पंतप्रधान मोदी यांनी हे ट्विट केलं आहे.
A proud moment for India as our exceptional compound Women’s Team brings home India’s first-ever gold medal in the World Archery Championship held in Berlin. Congratulations to our champions! Their hard work and dedication have led to this outstanding outcome. pic.twitter.com/oT8teX1bod
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2023
आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात, आपल्या अद्वितीय महिला तिरंदाजी संघाने बर्लिनमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवून देशासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं आहे. हा खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे. जगज्जेत्त्यांचं अभिनंदन! मेहनत आणि समर्पणामुळेच ही कामगिरी ते करू शकले.
विशेष म्हणजे भारताच्या कम्पाऊंड तिरंदाजी संघात ज्योती ही एकच अनुभवी तिरंदाज आहे. अदिती आणि परणीत या दोघी युवा आणि नुकत्याच ज्युनिअर गटातून सिनीअर गटात गेलेल्या तिरंदाज आहेत.
(हेही वाचा – India’s Tour of West Indies : एकदिवसीय मालिका जिंकली. पण, भारतीय संघातील हे कच्चे दुवे उघड)
संघावर कौतुकाचा वर्षाव
फक्त पंतप्रधान मोदीच नाही तर सर्व स्तरातून महिला संघाचं (World Archery Championship 2023) अभिनंदन होतंय. भारतीय संघाचे हाय परफॉर्मन्स डिरेक्टर संजीवा सिंग यांना तर ऑलिम्पिक पदकांची स्वप्न पडू लागली आहेत. 2028 च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत कम्पाऊंड तिरंदाजी प्रकाराचा समावेश आहे. आताची भारतीय महिलांची कामगिरी आणि कामगिरीतील सातत्य पाहता आपल्याला पदकाची आशा नक्कीच आहे. शिवाय ज्योती आणि संघाच्या या विजयामुळे इतरांनाही कम्पाऊंड प्रकारात खेळण्याची प्रेरणा मिळेल, असे संजीव सिंग मीडियाशी बोलताना म्हणाले.
भारतात आदिवासी भागात चांगले होतकरू तिरंदाज (World Archery Championship 2023) आहेत. पण, त्यांच्या कमी उंचीचा फटका रिकर्व्ह प्रकारात त्यांना बसतो. पण, कम्पाऊंड प्रकारात बाणाची कमाल उंची निश्चित केलेली आहे. त्यामुळे रिकर्व्ह खेळू न शकणारे तिरंदाज कम्पाऊंड खेळू शकतील आणि कम्पाऊंडच्या ऑलिम्पिक समावेशामुळे त्यांना स्फूर्तीही मिळेल, असा संजीव यांचा अंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community