-
ऋजुता लुकतुके
नीरज चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशावर आरुढ होत भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. (World Athletics Championship 2029)
भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने आता २०२९ च्या ॲथलेटिक्स विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाची सिद्धता सुरू केली आहे. अर्थात, अजून २०२९ च्या यजमानपदाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. पण, भारताकडून तशी अनधिकृत दावेदारी करण्यात आली आहे. (World Athletics Championship 2029)
यापूर्वी २०२७ ची अजिंक्यपद स्पर्धा भरवण्याचा भारताचा मानस होता. पण, आता भारताने २०२७ ऐवजी २०२९ च्या दावेदारीची तयारी सुरू केल्याचं काल भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनकडून स्पष्ट करण्यात आलं. २०२७ ची यजमानपदाची प्रक्रिया यावर्षाच्या सुरुवातीला सुरू झाली आहे आणि भारताने यजमानपदासाठी अर्ज केला नसल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. (World Athletics Championship 2029)
‘२०२९ च्या ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारत उत्सुक असेल. देशात २०३६ चं ऑलिम्पिक व्हावं आणि २०३० चं युवा ऑलिम्पिक व्हावं अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या स्पर्धांपूर्वी २०२९ मध्ये जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धाही देशात झाली तर ते संयुक्तिक असेल,’ असं ॲथलेटिक्स फेडरेशनची उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्जने पीटीआयशी बोलताना रविवारी सांगितलं. (World Athletics Championship 2029)
फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा अमृतसर इथं सुरू आहे. त्यावेळी अंजू यांनी पीटीआयशी संवाद साधला. (World Athletics Championship 2029)
(हेही वाचा – Ind vs Aus T20 : बरोबर प्रश्नांना जेव्हा सूर्यकुमार यादव चुकीची उत्तरं देतो)
ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दर दोन वर्षांनी होतात आणि ऑलिम्पिकनंतर त्या मानाच्या समजल्या जातात. २०२५ साली ही स्पर्धा जपानची राजधानी टोकयो इथं होणार आहेत. त्यानंतर २०२७ च्या स्पर्धेचं ठिकाण अजून निश्चित झालेलं नाही. (World Athletics Championship 2029)
भारतीय ॲथलीट्सनी २०३६ पर्यंत जागतिक स्पर्धा गाजवाव्या याची तयारीही ॲथलेटिक्स फेडरेशनने सुरू केली आहे. ‘गुणी खेळाडू हेरून येत्या ४-५ वर्षांत त्यातूनच जागतिक स्तरावरील विजेते खेळाडू तयार करण्याचं उद्दिष्ट फेडरेशनने ठेवलं आहे. २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताने ५-६ पदकं मिळवावीत अशी फेडरेशनची इच्छा आहे,’ असं ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष ललित भानोत यांनी सर्वसाधारण सभेत बोलताना म्हटलं आहे. (World Athletics Championship 2029)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community