World Athletics Tour 2025 : भारतात पुढील वर्षी होणार ॲथलेटिक्सची आंतरराष्ट्रीय स्पर्धा

World Athletics Tour 2025 : पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात भुवनेश्वर इथं ही स्पर्धा पार पडेल.

56
World Athletics Tour 2025 : भारतात पुढील वर्षी होणार ॲथलेटिक्सची आंतरराष्ट्रीय स्पर्धा
  • ऋजुता लुकतुके

भारतात पुढील वर्षी पहिल्यांदाच जागतिक आंतरखंड ॲथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात भुवनेश्वर इथं ही स्पर्धा पार पडेल. २०२५ मधील ॲथलेटिक्स स्पर्धांचं वेळापत्रक रविवारी जाहीर झालं, तेव्हा ही गोष्ट समोर आली आहे. भारतीय ॲथलेटिक्स असोसिएशनकडून स्पर्धेचं आयोजन होणार आहे. यापूर्वी १९८० आणि ९० च्या दशकात भारतात काही ॲथलेटिक्स स्पर्धा झाल्या होत्या. तर २००४ मध्ये जागतिक अर्ध मॅरेथॉन भारतात झाली होती. त्यानंतर ही प्रतीष्ठेची स्पर्धा भारतात भरवण्यात येणार आहे. (World Athletics Tour 2025)

(हेही वाचा – WPL Auction : डब्ल्यूपीएल लिलावातील सगळ्यात महागडी खेळाडू सिमरन शेख कोण आहे?)

‘काही परमिट स्पर्धांनंतर आता पहिल्यांदा जागतिक स्तरावरील एखादी ॲथलेटिक्स स्पर्धा भरवण्याचा मान भारताला मिळत आहे,’ असं फेडरेशनमधील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेनं स्पर्धांचं वर्गीकरण सुवर्ण, रौप्य, हिरक आणि कांस्य स्तरावरील स्पर्धांमध्ये केलं आहे. ही स्पर्धा कांस्य स्तरावरील असून प्रतिष्ठेच्या डायमंड्स लीग खालोखाल हिचा क्रमांक लागतो. (World Athletics Tour 2025)

(हेही वाचा – WPL Auction : १६ व्या वर्षी करोडपती झालेली कमलिनी कोण आहे?)

ही स्पर्धा एकदिवसीय असून १० ऑगस्टला ती होईल. ॲथलेटिक्समध्ये अलीकडे नीरज चोप्राने जागतिक स्तरावर नाव कमावलं आहे. डायमंड लीगबरोबरच टोकयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिसमध्ये त्याने रौप्य पदक जिंकलं आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने नीरज चोप्रा आपल्याला भारतात खेळताना दिसू शकेल. (World Athletics Tour 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.