वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 (World Championship of Legends final) च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला (India Vs Pakistan) धूळ चाखली आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानी संघावर पाच गडी राखून मात केली आहे. शनिवारी बर्मिंघम येथे हा सामना झाला. भारताने नुकतंच टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आता वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्टस 2024 स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला नमवत विजयी कामगिरी करून दाखवली आहे. (World Championship of Legends final)
(हेही वाचा –शाळा, कॉलेजच्या परिसरातील Energy Drinks वर बंदी कारवाई; सरकारने घेतला मोठा निर्णय)
पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 156 धावा केल्या. तर भारतीय संघाने विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूपर्यंत पाच गडी राखून धावांचे हे लक्ष्य गाठले. भारताकडून अंबाती रायुडूने जोरदार खेळी करत 50 धावा केल्या. अंबातीच्या या खेळीमुळेच भारताला विजयापर्यंत जाणं सोपं झालं. विजयासाठी लागणाऱ्या धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली रॉबीन उथप्पा आणि अंबाती रायुडू सलामीला आले. (World Championship of Legends final)
अंबाती रायुडूने 30 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकार लगावत 50 धावा केल्या. तर उथप्पाला 10 धावाच करता आल्या. गुरकीरत सिंहनेही 33 चेंडूंत 34 धावा केल्या. यात युसूफ पठाणने 16 चेंडूंमध्ये 30 धावा करून भारताचा विजय सुकर केला. आपल्या या खेळात त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. कर्णधार युवराज सिंगला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने 22 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या. तर पाकिस्तानी संघाच्या आमीरने दोन बळी घेतले. अजमल, रियाज आणि शोएब यांनी प्रत्येक एक बळी घेतला. (World Championship of Legends final)
(हेही वाचा –Donald Trump shooting: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार; नेमकं काय घडलं?)
दुसरीकडे फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमवून पाकिस्तानने 156 धावा केल्या. या संघाकडून शोएब मलिकने सर्वाधिक 41 धावा केल्या. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. या संघाचा सलामीवीर शरजील खान 10 चेंडूंमध्ये फक्त 12 धावा करून बाद झाला. मकसूदने 12 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या. कामरान अकमलने 19 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या. तर कर्णधार युनिस खानला 11 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा करता आल्या. गोलंदाजी विभागात भारतीय संघाकडून अनुरित सिंहने तीन बळी घेतले. (World Championship of Legends final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community