World Chess Championship 2024 : पहिल्या सामन्यात डिंग लिरेनची गुकेशवर मात

World Chess Championship 2024 : डावाच्या मध्यावर केलेली चूक गुकेशला महागात पडली.

132
World Chess Championship 2024 : पहिल्या सामन्यात डिंग लिरेनची गुकेशवर मात
  • ऋजुता लुकतुके

बुद्धिबळ जगज्जेतेपदाची अंतिम लढत सिंगापूरमध्ये सोमवारपासून सुरू झाली आहे आणि पहिल्या फेरीत भारताच्या डी गुकेशला पांढरे मोहरे घेऊन खेळताना पराभवाचा धक्का बसला आहे. १८ वर्षीय गुकेश हा बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठीचा वयाने सगळ्यात लहान आव्हानवीर आहे आणि डिंग लिरेन या वर्षी फारशा स्पर्धा खेळलेला नाही. अशावेळी अंतिम लढत नेमकी कशी पार पडते याकडे बुद्धिबळ जगताचं लक्ष लागून राहिलं आहे. पहिल्या लढतीत तरी गुकेशला अती आक्रमकपणा आणि डावाच्या मध्यावर उडालेला गोंधळ महागात पडला. अखेर ४२ व्या मिनिटाला गुकेशला पराभव मान्य करावा लागला. (World Chess Championship 2024)

गुकेशने सुरुवात राजासमोरचं प्यादं दोन पावलं पुढे टाकून केली. इथेच तो आक्रमक असणार हे स्पष्ट होतं आणि लिरेनने मात्र बचावात्मक पावित्रा घेतला. सुरुवातीला वेळेच्या बाबतीत डिंग लिरेन जवळ जवळ १ तास मागे होता. पण, डावाच्या मध्यावर गुकेशला वेळ आणि वेगाने करायच्या चाली यांची जुळवाजुळव करता आली नाही आणि तेव्हाच त्याच्याकडून चुका घडल्या. दोघांमध्ये झालेला खेळ तुम्ही खालील ट्विटमध्ये पाहू शकता. (World Chess Championship 2024)

(हेही वाचा – Assembly Election Result 2024 : आधी पत्ता कापला, मग निवडून देत भाजपाने केले प्रायश्चित)

डावाच्या मध्यावर लिरेनने आपली राणी राणीच्या बदल्यात देऊ केली आणि ही चाल गुकेशला कळली नाही. पुढे गुकेशने आपली आणखी ३ प्यादी गमावली आणि पटावर डिंग लिरेनचं वर्चस्व प्रस्थापित झालं. तिथून पुढे गुकेशचं वेळेचं गणितही बिघडलं. शेवटी ४६ सेकंदांत त्याला ७ चाली रचायच्या होत्या. (World Chess Championship 2024)

अखेर ४२ व्या मिनिटाला गुकेशने पराभव मान्य केला. १४ वर्षांनंतर प्रथमच जगज्जेतेपदाच्या अंतिम फेरीत पहिला सामना निकाली ठरला आहे. यापूर्वी विश्वनाथन आनंदने व्हेसलिन तोपालोवविरुद्ध पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर पहिली लढत कायमच बरोबरीत सुटली आहे. जगज्जेतेपदासाठी एकूण १४ लढती होणार आहेत. दुसरी लढत मंगळवारी लगेच होईल. (World Chess Championship 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.