-
ऋजुता लुकतुके
भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने (Gukesh Dommaraju) जगज्जेत्या डिंग लिरेन (Ding Liren) विरुद्ध ११ वा डाव जिंकून बुद्धिबळ जगतात खळबळ उडवून दिली आहे. या विजयासह अंतिम फेरीत आता गुकेशकडे ६-५ अशी आधाडी आली आहे. अंतिम लढतीत अजून ३ डाव बाकी आहेत. आणि हे डाव बरोबरीत सोडवले तरी गुकेशचं जगज्जतेपद निश्चित होईल. विजेतेपद साध्य केलं तर अशी कामगिरी करणारा गुकेश (Gukesh Dommaraju) हा वयाने सगळ्यात लहान खेळाडू ठरेल. गुकेश फक्त १८ वर्षांचा आहे. (World Chess Championship 2024)
मागचे दोन डाव दोघंही बरोबरीसाठी खेळले होते. पण, या डावात गुकेशने (Gukesh Dommaraju) विचारपूर्वक खेळ केला. आणि प्रतिस्पर्धी डिंग लिरेन (Ding Liren) मात्र काहीसा गडबडलेला दिसला. गुकेशने उंचासमोरचं प्यादं पुढे केल्यावर त्याला बेनोली पद्धतीने उत्तर देण्याचा लिरेनने प्रयत्न केला. पण, त्यात सुनियोजित बचाव नव्हता. त्यामुळे वेळेच्या बाबतीत लिरेन मागे पडत गेला. पहिल्या ५ चालींमध्येच गुकेश वेळेच्या बाबतीत एका तासाने पुढे गेला. लिरेनवरील दडपण पुढे वाढतच गेलं. आणि अखेर गुकेशकडे एक हत्ती जास्त असताना त्याने पराभव मान्य केला. १४ डावांची ही लढत आपल्या उत्तरार्धात पोहोचली असताना मोक्याच्या क्षणी गुकेशने (Gukesh Dommaraju) ही आघाडी घेतली आहे. (World Chess Championship 2024)
(हेही वाचा – Markadwadi ही पवार, जानकरांची मक्तेदारी नाही; बावनकुळेंनी मांडली मतदानाची आकडेवारी)
AN UNFORGETTABLE VICTORY FOR GUKESH! 👏 #DingGukesh pic.twitter.com/zt7NpLFSfl
— Chess.com (@chesscom) December 8, 2024
(हेही वाचा – Gadchiroli बाबत ‘या’ विकासाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!)
बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या (World Chess Championship 2024) या लढतीचे आता फक्त शेवटचे ३ डाव बाकी आहेत. आणि यातील एक डाव गुकेश (Gukesh Dommaraju) पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळेल. तर उर्वरित दोन डावांत लिरेनकडे पांढरे मोहरे असतील. सोमवारच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून उर्वरित डावांना सुरुवात होईल. गुकेशकडे विजयाची मोठी संधी असेल.
आतापर्यंतच्या १० डावांमध्ये दोन्ही ग्रँडमास्टरकडून काही ना काही चुका झाल्या होत्या. आणि प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक वर्चस्व राखण्यात दोघंही कमी पडले होते. पण, यावेळी लिरेन (Ding Liren) वेळेच्या कचाट्यात सापडला. आणि राणी चुकीच्य जागी हलवून त्याने आपली बाजू कमजोर करून घेतली. २८ व्या चालीत ही चूक घडल्यावर त्यानेच लगेचच पराभव मान्य केला. आणि २८ चालींत गुकेशने (Gukesh Dommaraju) विजय मिळवला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community