- ऋजुता लुकतुके
चिनी जगज्जेता डिंग लिरेनने गुकेश विरुद्घ १२ वा डाव जिंकून अंतिम लढतीत ६-६ अशी बरोबरी साधली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या टप्प्यात असलेल्या या लढतीत नव्याने जान फुंकली आहे. आता शेवटचे दोन डाव बाकी आहेत. आणि यातील एक सामना जिंकला आणि दुसरा बरोबरीत सोडवला तरी तो खेळाडू विजेतेपद पटकावू शकेल आणि उर्वरित डावात बरोबरी झाली तर अंतिम लढत टायब्रेकरवर जाईल. (World Chess Championship)
बाराव्या लढतीत लिरेनकडे पांढऱ्या मोहरे होते आणि त्याने इंग्लिश ओपनिंगने डावाची सुरुवात केली. त्याला गुकेशने उंचासमोरचं प्यादं पुढे करून उत्तर दिलं. पहिल्या किमान १७ चालींमध्ये गुकेशकडे वेळेत आघाडी होती आणि त्याच्याकडे ५४ मिनिटं शिल्लक होती. पण, त्यानंतर हळू हळू लिरेनने डावावर वर्चस्व मिळवलं. मधल्या टप्प्यात त्याची प्रत्येक चाल गुकेशला कोंडीत पकडणारी होती आणि अखेर ५० चालींनंतर गुकेशने पराभव मान्य केला. (World Chess Championship)
(हेही वाचा – कर्नाटकातील काँग्रेस सरकार विधानसभा सभागृहातून काढणार Veer Savarkar यांची प्रतिमा; भाजपाकडून निषेध)
“This was the best Ding that exists!” (Giri) Ding Liren finishes with a rook sacrifice to end a brilliant game that levels the World Championship score at 6-6 with 2 games to go! #DingGukesh pic.twitter.com/82KnLpY9ou
— chess24 (@chess24com) December 9, 2024
बाराव्या डावांत अचूक चालींच्या बाबती लिरेनची अचूकता ९८ टक्के इतकी होती. तर गुकेशची शेवटच्या टप्प्यात ८८ टक्क्यांपर्यंत घसरली. सामन्यानंतर गुकेशने शेवटच्या दोन सामन्यांविषयी आशावाद व्यक्त केला आहे. ‘आघाडीनंतर पुढचा डाव हरणं कधीच चांगलं नसतं. त्यामुळे या पराभवाचं दु:ख नक्कीच आहे. पण, निदान डाव बरोबरीत आहे. आणि उर्वरित दोन डावांमध्ये दोघांना समान संधी आहे. पांढऱ्या मोहऱ्यांचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न मी करेन,’ असं गुकेश डाव संपल्यावर म्हणाला. (World Chess Championship)
बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची ही अंतिम फेरी आहे आणि सगळ्यात आधी ७.५ गुण मिळवणारा खेळाडू विजयी होणार आहे. मंगळवारच्या विश्रांतीनंतर उर्वरित दोन डाव बुधवार आणि गुरुवारी खेळवण्यात येतील. (World Chess Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community