-
ऋजुता लुकतुके
जागतिक बुद्धिबळ जगज्जेतेपदाचा (World Chess Championship) सातवा डाव हा १८ वर्षीय आव्हानवीर डी गुकेशच्या (Gukesh Dommaraju) सकारात्मक आणि विजयासाठी प्रयत्नशील चालींसाठी आणि त्यांना अनुभवाच्या जोरावर थोपवून धरणाऱ्या ३२ वर्षीय जगज्जेत्या डिंग लिरेनच्या थक्क करणाऱ्या प्रतिकारामुळे लक्षात राहील असा ठरला. डावाच्या मध्यापर्यंत गुकेश जिंकू शकेल असं वाटत असताना शेवटच्या टप्प्यात वेळ आणि रणनीती या दोन्ही मागे पडलेल्या लिरेनने (Ding Liren) शर्थीचे प्रयत्न करून पटावर बरोबरी आणली. आणि अखेर ७२ चालींनंतर गुकेशला बरोबरीचा प्रस्ताव मान्य करावा लागला.
५ तास आणि २२ मिनिटं ही लढत रंगली. आणि गुकेशने (Gukesh Dommaraju) एकदा पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला. पण, लिरेनने (Ding Liren) तो ही नाही घेतला. तो पूर्णवेळ खुर्चीवर बसून होता. दोघांमध्ये आता ३.५ अशी गुणांची बरोबरी आहे. गुकेश (Gukesh Dommaraju) पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळत होता. त्याचा फायदा उचलत सुरुवातीला त्याने चांगली मुसंडी मारली होती. डावाच्या मध्यावर तो एक उंट आणि एका पाद्याने पुढे होता. शिवाय वेळेच्या बाबतीही तो लिरेनपेक्षा किमान अर्धा तास पुढे होता. पण, शेवटच्या टप्प्यात त्याच्याकडून एक चूक झाली. आणि लिरेनने लगेच त्याचा फायदा करून घेतला.
(हेही वाचा – Indian Navy Day 2024 : भारतीय नौदल दिनाचे काय आहे महत्त्व?)
“The score is fine. Obviously, today was a missed chance. That is a bit of a disappointment, but he also missed some chances earlier in the match. So, I think it’s fair that we are here. The second half will be, of course, crucial.” – 🇮🇳 Gukesh D on the current match score 3½-3½,… pic.twitter.com/Ce9j2OphSY
— International Chess Federation (@FIDE_chess) December 3, 2024
लिरेनने पिछाडीवर असूनही डावात कायम भक्कम बचावावर भर दिला. आणि जेव्हा गुकेशकडून (Gukesh Dommaraju) चूक झाली तेव्हा झटपट आपली बाजू सावरून त्याने बचाव आणखी भक्कम केला. सुरुवातीपासूनच तो बरोबरीसाठी खेळत होता. त्यामुळे शेवटी त्याने इप्सित साध्य केलं, असं म्हणावं लागेल. ४० व्या चालीत तो एका प्याद्याने मागे पडला होता. गुकेशला (Gukesh Dommaraju) तेव्हा विजयाची संधी होती. पण, पुढच्या काही चालींमध्ये दडपण कायम ठेवण्यात गुकेश कमी पडला. आणि लिरेनने (Ding Liren) ती संधी उचलली.
जगज्जेतेपदाची ही अंतिम लढत ३.५ – ३.५ अशी बरोबरीत आहे. आणि आतापर्यंतच्या डावांमध्ये दोघांनीही आपल्या परीने सर्वोत्तम खेळ केला आहे. त्यामुळे गुकेशच्या (Gukesh Dommaraju) सकारात्मक चाली आणि लिरेनचा भक्कम बचाव अशी लढत रंगली आहे. अंतिम फेरीत अजून ७ लढती बाकी आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community