-
ऋजुता लुकतुके
जगज्जेता डिंग लिरेन (Ding Liren) आणि आव्हानवीर डी गुकेश (Gukesh Dommaraju) यांच्यातील अंतिम फेरीच्या लढती दिवसेंदिवस अतिशय चुरशीच्या होत चालल्या आहेत. मंगळवारची लढत साडेपाच तास चालली होती. बुधवारीही एक अशीच मॅरेथॉन लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या लढतीतही चुरस, आक्रमकता, एकमेकांची खरी परीक्षा पाहणाऱ्या चाली आणि दोन्ही खेळाडूंचं कसब पणाला लागलेला खेळ पाहायला मिळाला. अखेर ५२ चालींनंतर दोघांनी बरोबरी मान्यता केली. त्यामुळे ८ डावांनंतर ४-४ अशी गुणसंख्या कायम राहिली आहे. (World Chess Championship)
३२ वर्षीय लिरेनने (Ding Liren) पहिला डाव जिंकला होता. तर गुकेशने (Gukesh Dommaraju) तिसरा जिंकला होता. बाकीचे सहाही डाव बरोबरीत सुटले आहेत. पण, या बरोबरीत सुटलेल्या सामन्यांमध्येही तुल्यबळ खेळ बघायला मिळाला आहे. आठव्या डावात लिरेनकडे (Ding Liren) काही काळ आघाडी होती. आक्रमक चाली रचण्याच्या नादात गुकेशने (Gukesh Dommaraju) आपला हत्तीही गमावला होता. पण, हळू हळू तो त्यातून सावरला. आणि किमान बरोबरी निश्चित केली. (World Chess Championship)
(हेही वाचा – Maharashtra Rain : राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अंदाज काय सांगतो ?)
Game 8 ends in a draw at the 2024 FIDE World Championship Match, presented by Google. #DingGukesh
Both Ding Liren and Gukesh D had chances to win the game today.
📷 Eng Chin An pic.twitter.com/j5TcANatf9
— International Chess Federation (@FIDE_chess) December 4, 2024
(हेही वाचा – BMC : बालवाडीतील मुलांना मिळणार जादुई पिटारा)
दुसरीकडे, लिरेन (Ding Liren) बरोबरीसाठीच खेळत होता. लिरेनने इंग्लिश ओपनिंगने डावाची सुरुवात केली. पण, डावाच्या मध्यावर दोघंही आपापल्या नेहमीच्या शैलीकडे वळले. आणि गुकेशच्या मते मध्यावर त्याने जाणकारांना अपेक्षित चाली रचल्या नसल्या तरी त्याचा तो रचत असलेल्या चालींवर विश्वास होता. आणि लिरेनच्या दुबळ्या राजावर तो आक्रमण करत होता.
आता पुढील डावात गुकेशकडे (Gukesh Dommaraju) पांढरे मोहरे असतील. या अंतिम फेरीतील निम्म्याहून अधिक डाव पार पडले आहेत. आणि सर्व प्रथम ७.५ गुण मिळवणारा खेळाडू जगज्जेता ठरेल. त्यामुळे आगामी २ ते ३ डाव महत्त्वाचे ठरणार आहेत. यात विजय मिळवणारा खेळाडू जगज्जेता ठरवू शकतो. लिरेन या लढतीपूर्वी फारसं बुद्धिबळ खेळलेला नव्हता. त्यामुळे तो कितपत चांगलं खेळेल अशी शंका व्यक्त केली जात होती. पण, प्रत्यक्षात लिरेनने (Ding Liren) दमदार खेळ केला आहे. आणि त्याच्यासमोर गुकेशला आपलं कसब पणाला लावावं लागत आहे. तर लिरेनकडून ऐनवेळी झालेल्या काही चुकांमुळे त्याची विजयाची संधी दोनदा हुकली आहे. (World Chess Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community