- ऋजुता लुकतुके
सध्याचा विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन आणि त्याचा आव्हानवीर डी गुकेश यांच्यातील विश्वविजेतेपदाचा सामना अखेर सिंगापूरला होणार आहे. फिडे या बुद्धिबळातील जागतिक संघटनेनं हा निर्णय सोमवारी जाहीर केला. भारतानेही चेन्नई किंवा नवी दिल्लीचा प्रस्ताव फिडेकडे ठेवला होता. पण, यजमानपदाचं दान सिंगापूरच्या पारड्यात पडलं. याचवर्षी २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत या लढती पार पडतील. (World Chess Championship)
डी गुकेशने या वर्षाच्या सुरुवातीला कँडिडेट्स चषकात विजेतेपद पटकावून लिरेनचा आव्हानवीर होण्याचा मान पटकावला होता. १७ व्या हा मान पटकावून तो वयाने सगळ्यात लहान आव्हानवीर ठरला आहे. विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेची एकूण बक्षिसाची रक्कम २.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. (World Chess Championship)
‘सर्व शहरांकडून आलेले प्रस्ताव, तिथल्या सुविधा, स्पर्धेचं नियोजन यांचा अभ्यास करून जागतिक बुद्धिबळ संघटनेनं यजमान देश म्हणून सिंगापूरची निवड केली आहे. २०२४ ची विश्वविजेतेपद स्पर्धा सिंगापूरला होईल,’ असं फिडेनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. (World Chess Championship)
🇸🇬 Singapore will host the 2024 FIDE World Championship Match ♟️ 🏆
⚔️ The defending World Champion, 🇨🇳 Ding Liren, will battle it out against the Challenger, 🇮🇳 Gukesh D. The Match, which boasts a sensational prize fund of 💰 2.5 million USD, is set to take place between 🗓️… pic.twitter.com/2fL93Gpq6J
— International Chess Federation (@FIDE_chess) July 1, 2024
(हेही वाचा – ओडिसी साहित्यात नवा प्रवाह निर्माण करणारे ओडिसी कादंबरीकार Kalindi Charan Panigrahi)
यावर्षी एप्रिल महिन्यात गुकेशने कँडिडेट्स चषक स्पर्धा जिंकली होती. आता तो सज्ज झाला आहे विश्वविजेत्या लिरेनला आव्हान देण्यासाठी. ‘स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना सिंगापूरला होत आहे. याचा मला आनंद होतोय. सिंगापूर हे आशियातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र तर आहेच. शिवाय बुद्धिबळाचाही चांगला प्रसार इथं झालेला आहे. त्यामुळे अंतिम स्पर्धेसाठी हे शहर एकदम योग्य आहे,’ असं फिडे संघटनेचे अध्यक्ष अरकाडी डीवोकोविच म्हणाले. (World Chess Championship)
फिडेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एमिल सुतोवस्की यांनीही सिंगापूरच्या निवडीचं स्वागत केलं. ‘सिंगापूरकडे खेळाला योग्य आणखीसह पुढे घेऊन जाण्याची क्षमता आहे. त्यांनी बहुउद्देशीय कंपन्यांना बुद्धिबळाशी जोडून या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी फिडेला मदत करावी,’ असं आवाहन सुतोवस्की यांनी केलं. (World Chess Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community