-
ऋजुता लुकतुके
बुद्धिबळ विश्वात या वर्षी भारतीय बुद्धिबळपटूंचा निर्विवाद दबदबा राहिला आहे. डी गुकेशने १९ व्या वर्षी विश्वविजेतेपद पटकावून तर इतिहास रचलाच आहे. शिवाय अर्जुन एरिगाईसी (Arjun Erigaisi) आणि प्रज्ञानंद (Praggnanandhaa) यांनीही अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनला नमवलं आहे. आणि भारतीय पुरुषांनी मानाची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा जिंकली आहे. आता वर्ष संपत असताना खेळाडूंसमोर आव्हान आहे ते रॅपिड आणि ब्रिट्झ प्रकारातील विश्वचषकाचा. अमेरिकेत ही स्पर्धा गुरुवारपासून सुरू होत आहे. आणि डी गुकेशच्या (Gukesh Dommaraju) अनुपस्थितीत भारताची धुरा अर्जुन एरिगाईसी (Arjun Erigaisi) आणि प्रज्ञानंद (Praggnanandhaa) सांभाळणार आहेत. (World Chess Rapid and Blitz Championship)
अर्जुन सध्या भारताचा अव्वल बुद्धिबळपटू आहे. आणि नुकतंच त्याने २८०० एलो गुणांचं मानांकन पटकावलं आहे. अशी कामगिरी करणारा विश्वनाथन आनंद नंतरचा तो फक्त दुसरा भारतीय आहे. अमेरिकेत येताना त्याला व्हिसा मिळवण्यात अडचणी येत होत्या. पण, त्या दूर झाल्यावर उशिरा का होईना, ते अमेरिकेत पोहोचला आहे. (World Chess Rapid and Blitz Championship)
(हेही वाचा – Delhi Assembly Election : दिल्लीत उमेदवारीसाठी भाजपामध्ये जोरदार चुरस)
I have received the US Visa!
I am honestly overwhelmed and very grateful for so much positive response to my situation 🙏
Thank you to the @USAndIndia & @USAmbIndia for the quick turn around!
Thank you @MEAIndia @anandmahindra @narangnitin @aicfchess @IndiaSports @FIDE_chess…
— Arjun Erigaisi (@ArjunErigaisi) December 23, 2024
महिला विभागातही हरिका द्रोणवल्ली, दिव्या देशमुख, वैशाली आणि कोनेरू हंपी या प्रमुख खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत. या स्पर्धेत जगभरातील अव्वल खेळाडू खेळणार आहेत. आणि नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आपलं विजेतेपद टिकवून ठेवण्यासाठी खेळेल. पारंपरिक बुद्धिबळाच्या तुलनेत रॅपिड आणि ब्लिट्झ प्रकारातही खेळायला अतिशय कमी वेळ मिळतो. त्यामुळे हे आव्हान कठीण आहे. त्यासाठी वेगळा सराव आणि हातोटी लागते. (World Chess Rapid and Blitz Championship)
(हेही वाचा – Boxing Day Test : विराट कोहलीवर बेशिस्त वर्तनासाठी कारवाई, २० टक्के मानधन कापणार )
२६ डिसेंबरपासून ५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत रॅपिड प्रकारात १५ मिनिटांत दोन्ही खेळाडूंना आपल्या पहिल्या ४० चाली रचाव्या लागतील. त्या पूर्ण झाल्या तर पुढील प्रत्येक चालीला १० सेकंदांची वाढ मिळेल. अशा १३ फेऱ्या खुल्या वर्गात होणार आहेत. तर महिलांसाठी ११ फेऱ्या होतील. (World Chess Rapid and Blitz Championship)
ब्लिट्झ प्रकारात ३ मिनिटांचे डाव होतील. आणि पहिल्या ४० चालींनंतर २ सेकंदांची वाढ होईल. इथंही खुल्या वर्गात १३ आणि महिला विभागात ११ फेऱ्या होतील. ३१ तारखेला ब्लिट्झ प्रकारातील बाद फेऱ्या पार पडतील. मॅग्नस कार्लसन ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. आणि त्याला स्पर्धा असणार आहे ती हिकारू नाकामुरा, फाबिआनो कारुआना, अलीरेझा फिरौझा आणि भारताचा अर्जुन एरिगाईसी (Arjun Erigaisi) यांची. भारताला अर्जुन एरिगाईसीकडून आशा असतील. (World Chess Rapid and Blitz Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community