-
ऋजुता लुकतुके
नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवतानाच अनेक विक्रमही पार केले. यातलाच एक डेव्हिड वॉर्नरच्या सहा शतकांचा. त्या निमित्ताने पाहूया विश्वचषकातील शतकवीरांची आकडेवारी. या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाची गाडी रुळावरून घसरली होती. पण, आता नंतरच्या दोन सामन्यात दरदार विजय मिळवत संघ सुरुवातीच्या धक्क्यातून सावरलेला दिसतोय. (World Cup 2023)
नेदरलँड्स विरुद्ध तर संघाने निर्णायक वर्चस्व गाजवत ३०९ धावांनी मोठा विजय साकार केला. आधी फलंदाजांनी ५० षटकांत ८ बाद ३९९ ही धावसंख्या उभारली आणि त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी डच फलंदाजांना ९० धावांतच गुंडाळलं. या मोठ्या विजयानंतरही संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम असला तरी संघाचा नेटरनरेट चांगलाच वर आला आहे. (World Cup 2023)
त्याहून महत्त्वाचं म्हणजे ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड वॉर्नर या शतकवीर फलंदाजांनी फलंदाजीचे अनेक विक्रमही मोडले आहेत. मॅक्सवेलने ४४ चेंडूत १०६ धावा करताना विश्वचषकातील आतापर्यंतचं सगळ्यात जलग शतक झळकावलं. तर डेव्हिड वॉर्नरचं हे विश्वचषक स्पर्धेतील सहावं शतक होतं आणि त्याने आता सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्या निमित्ताने बघूया विश्वचषक स्पर्धेतील सगळ्यात जास्त शतकं कुणाच्या नावावर आहेत. (World Cup 2023)
१. रोहित शर्मा
भारतीय कर्णधार रोहित शर्मा २०१५ चा विश्वचषक पहिल्यांदा खेळला. तोपर्यंत तो भारतीय संघातही नियमितपणे नव्हता. पण, याची कसर त्याने २०१९ च्या इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भरून काढली. इंग्लिश उन्हाळ्यात पार पडलेला हा विश्वचषक जिंकला इंग्लंडने. पण, गाजवला रोहित शर्माने. या स्पर्धेत विराटने एकूण ५ शतकं ठोकली. विश्वचषकातील सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याने २३ डावांमध्ये ७ शतकं ठोकली आहेत. यातील एक यंदाच्या विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचं शतकही आहे. (World Cup 2023)
२. सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरच्या नावावर विश्वचषकात सहा शतकांची नोंद आहे. १९९६ साली श्रीलंकेविरुद्ध सचिनने आपलं पहिलं विश्वचषकातील शतक नोंदवलं होतं आणि पुढे २००३ चा विश्वचषक सचिनसाठी सर्वोत्तम ठरला होता. यात त्याने ६७३ धावा केल्या. एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्याच नावावर आहे. सचिन तेंडुलकर एकूण ६ विश्वचषक खेळला आणि यात त्याने चार स्पर्धांमध्ये किमान एक शतक ठोकलं आहे. (World Cup 2023)
३. डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आता सचिनच्या पंक्तीत येऊन बसला आहे. नेदरलँड्स विरुद्धचं शतक त्यांच विश्वचषकातील सहावं शतक होतं. (World Cup 2023)
Another wonderful World Cup Warner innings 👏https://t.co/Ooa5KmJ6L7 | #AUSvNED | #CWC23 pic.twitter.com/DkpWRNIrhq
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 25, 2023
(हेही वाचा – One Nation, One Election : उच्चस्तरीय समिती आणि विधी आयोगाच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’चा रोड मॅप सादर)
इतकंच नाही तर वॉर्नर जम बसल्यावर मोठी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि विश्वचषकात तीनदा १५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. (World Cup 2023)
४. कुमार संगकारा
श्रीलंकेचा डावखुरा सलामीवीर कुमार संगकाराच्या नावावर पाच विश्वचषक शतकं आहेत आणि सलग चार शतकं ठोकणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. संगकारा पाच विश्वचषक खेळला. (World Cup 2023)
५. रिकी पाँटिंग
संगकाराप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंगच्याही नावावर पाच शतकं आहेत. विशेष म्हणजे पाँटिंग पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आणि यातील चार स्पर्धांमध्ये त्याने किमान एक शतक केलेलं आहे. (World Cup 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community