न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने शतक झळकावले असले तरी मोहम्मद शामीच्या पाच विकेटच्या बळावर भारताने न्यूझीलंडला २७३ धावांवर रोखले. न्यूझीलंडच्या धावाला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले.शमीने या सामन्यात सर्वाधिक चार विकेट् मिळवल्या. त्यामुळेच न्यूझीलंडच्या संघाला २७३ धावांवर समाधान मानावे लागले. मिचेलने यावेळी ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १३० धावा केल्या. पण तरीही न्यूझीलंडला २७३ धावांवरच समाधान मानावे लागले. (world cup 2023)
रोहित शर्माने टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्विकारली आणि गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवला. कारण मोहम्मद शमीने डेव्हॉन कॉनवेला शून्यावर बाद केले. त्यानंतर मोहम्मद शमीने सलामीवीर विल यंगला १७ धावांवर बाद केले आणि संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यामुळे न्यूझीलंडची २ बाद १९ अशी अवस्था झाली होती. पम त्यानंतर राचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची दमदार भागीदारी रचली.
(हेही वाचा :Navi Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा ठरला, या दिवशी होणार मेट्रोचा लोकार्पण सोहळा)
ही भागीदारी आता संघाला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाटत होते. त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या हाततात चेंडू दिला आणि त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. कारण शमीने त्यानंतर राचिन रवींद्रला बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. राचिनने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७५ धावांची खेळी साकारली. ही विकेट भारतासाठी महत्वाची ठरली. कारण जर ही विकेट भारताला मिळाली नसती तर त्यांनी मोठी धावसंख्या उभारली असती. पण मोक्याच्या क्षणी शमीने रवींद्रला बाद केले आणि तिथेच हा सामना भारताच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर भारताने न्यूझीलंडच्या एकामागून एक विकेट्स घेतल्या आणि त्यांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
Join Our WhatsApp Community