-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन संघ या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यासाठी जंग जंग पछाडतोय. चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघासमोरील आव्हान अजून संपलेलं नाही. पण, त्याचवेळी संघातील मुख्य गोलंदाज मिचेल मार्श अचानक मायदेशी परतल्यामुळे संघात गोंधळ पसरला आहे. (World Cup 2023)
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श घरगुती कारणांमुळे अचानक मायदेशी परतला आहे. तो परत कधी येईल, हे सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी धडपडणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला हा दुसरा मोठा धक्का आहे. एकच दिवसापूर्वी संघाचा फॉर्ममध्ये असलेला ग्लेन मॅक्सवेल हा खेळाडूही दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे संघाच्या इंग्लंड विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हे दोन खेळाडू संघात नसतील. (World Cup 2023)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली आहे. (World Cup 2023)
JUST IN:
Mitch Marsh has returned home for “personal reasons” and is out of the World Cup indefinitely #CWC23— cricket.com.au (@cricketcomau) November 2, 2023
मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे संघाला हा मोठा फटका बसणार आहे. मॅक्सवेलला एकच दिवसापूर्वी गोल्फ कार्टमधून पडून दुखापत झाली होती. त्यामुळे निदान ७-८ दिवस तो खेळू शकणार नाहीए. त्यातच आता मार्श घरी परतलाय. या दोघांच्या जागी ॲलेक्स कॅरी, सीन एबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्यापैकी दोघांना संधी मिळू शकते. (World Cup 2023)
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या स्थगितीने छोट्या व्यापाऱ्यांची दिवाळी होणार गोड)
याशिवाय तन्वीर संगा हा राखीव खेळाडूही संघाबरोबर आहे. पण, मिचेल मार्श नेमका किती दिवस संघाबरोबर नसेल हे अजून स्पष्ट नाहीए. कारण, त्यानुसार ऑस्ट्रेलियन संघ बदली खेळाडूची मागणी करू शकेल आणि तशी मागणी केल्यास त्यासाठी आयोजन मंडळाच्या तांत्रिक समितीची परवानगी त्यासाठी घ्यावी लागेल. (World Cup 2023)
मार्शने या विश्वचषकात आतापर्यंत २२५ धावा केल्या आहेत. तर दोन बळीही मिळवले आहेत. पाकिस्तान विरुद्ध बंगळुरू इथं त्याने १२१ धावा केल्या होत्या आणि तेव्हापासून तो फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना ४ नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध होणार आहे. तर त्यानंतरचा सामना ११ नोव्हेंबरला बांगलादेश बरोबर आहे. (World Cup 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community