भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. त्यानिमित्त भारतीय एअर फोर्सच्या सूर्य किरण एअरोबॅटिक टीमकडून सामन्याआधी आकाशात “एअर शो” दाखवला जाणार आहे.
या सामन्याआधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सोमवारी, १९ नोव्हेंबर रोजी सामन्याआधी १० मिनिटांचा एअर शो होणार आहे. या सामन्यावेळी एअर फोर्सच्या सूर्यकिरण टीमला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकिरण टीमध्ये ९ एअरक्राफ्टचा समावेश आहे.
(हेही वाचा – Indian Wins Lottery : दुबईतील एका तरुणाला ४५ कोटी रुपयांची लॉटरी, एका रात्रीत करोडपती )
सूर्य किरण टीमची स्थापना १९९६ मध्ये करण्यात आली होती. भारतीय एअर फोर्सची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून ही टीम काम करत असते. सूर्य किरण टीम त्यांच्या ‘एअर शो’साठी ओळखली जाते. टीमने भारतात आणि जगातील इतर देशांमध्येही आपल्या कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. टीममध्ये एकूण १३ पायलट असतात. त्यातील ९ जण प्रत्यक्ष करतब दाखवतात. पायलट तीन वर्ष या टीममध्ये राहू शकतात.
Guess What …!!#suryakiran #aerobatic #team #india #iaf #indianairforce #gujarat
Join Our WhatsApp Community#ahmedabad #riverfront #fighterjets #fighteraircraft #hawk #fighterpilot #aviation #aviationlovers #airtoairphotography #aviationphotography #cwc23 #icc #teamindia #blueskies #happylandings pic.twitter.com/asVo8Voqqm
— Suryakiran Aerobatic Team (@Suryakiran_IAF) November 16, 2023