भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचदरम्यान अहमदाबाद पोलिसांनी बनावट तिकिटांच्या होणाऱ्या विक्रीबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे अंतिम समान्यादरम्यान अशी घटना पुन्हा घडू नये, याकरिता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना १९ नोव्हेंबराला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ जागतिक फायनलमध्ये दुसऱ्यांदा भिडणार आहेत. अंतिम फेरीची सर्व तिकीटे विकली गेली आहेत. या सामन्यासाठी १ लाख ३० हजारांहून अधिक लोकं स्टेडियममध्ये बसून हा सामना पाहतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा – Devendra Fadnavis: पुढल्या वर्षी दिवाळी ‘सागर’ की ‘वर्षा’ बंगल्यावर साजरी करणार? प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले… )
विश्वचषकादरम्यान या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यादरम्यान बनावट तिकिटे विकणारी टोळीही सक्रिय झाली होती. त्यामुळे अशा परिस्थितीत क्रिकेटप्रेमींनाही बनावट तिकिटांपासून सावध राहावे लागणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात 100 हून अधिक बनावट तिकिटे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे या सामन्यात असा कोणताही प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. बनावट तिकिटांबाबत लोकांचा गैरसमज होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. जेणेकरून क्रीडाप्रेमी स्वत:च त्यांचे तिकीट खरे आहे की बनावट आहे हे तपासू शकतात.
– सहसा बनावट आणि खऱ्या तिकिटातला फरक सहज कोणी सांगू शकत नाही, पण तिकिटांचा रंग, बारकोड, मॅक्रो लेन्स, वाईड फिचर्स इत्यादींच्या मदतीने तिकिट ओळखता येतात.
– तिकिटाच्या शीर्षस्थानी एक रंग कोड असतो. जो प्रकाशात वेगळा दिसतो. मूळ तिकिटाच्या वरच्या बाजूला कलर बार असतो. जेव्हा तिकिट प्रकाशात पाहिले जाते तेव्हा त्याचा रंग वेगळा दिसतो.
-वाईड फिचर्स तिकिटाच्या मागच्या बाजूला तळाशी दिलेली असतात. फिकट चंदेरी रंगाच्या पट्टीमध्ये ही वाईड फिचर्स असतात.
– तिकिटाच्या मागील बाजूस खाली काही नियम लिहिले जातात. नियम इतक्या लहान अक्षरात लिहिलेले असतात की, ते फक्त भिंगानेच (मॅग्निफाइल लेंस) वाचता येतात. बनावट तिकिटावर मागच्या बाजूला हे नियम लिहिलेले नसतात.
– खऱ्या तिकिटाच्या पुढच्या बाजूला बारकोड खाली दिलेला असतो. बनावट तिकिटांवरही बारकोड असतो, पण तो खोटा असतो. स्टेडियममध्ये प्रवेश करताना तो स्कॅन करता येत नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community