-
ऋजुता लुकतुके
इंग्लिश संघाची विश्वचषक मोहीम तर संघासाठी विसरण्यासारखीच गेली आहे. त्यातच भारतातील प्रमुख शहरांमध्ये वाढलेल्या प्रदूषणाच्या पातळीमुळे संघ हैराण झाला आहे. (World Cup 2023)
भारताच्या सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय आणि हवेतील शुद्धतेची पातळी खूपच खालावलीय. विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात आलेल्या संघांनाही याचा त्रास होतोय. इंग्लंड संघाची विश्वचषक मोहीम आधीच अडचणीत आहे. त्यातच खेळाडू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी इन्हेलर वापरू लागले आहेत. (World Cup 2023)
इंग्लंडमधील आय या वृत्तपत्राने याविषयी खास बातमी केली आहे. दमा असलेले लोक वापतात तसा इन्हेलर खेळाडूंना वापरावा लागतोय, असं या बातमीत म्हटलंय. तर काही खेळाडूंना इन्हेलर वापरायची सक्तीच इंग्लिश संघ प्रशासनाने केली आहे. (World Cup 2023)
श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात बंगळुरू इथं बेन स्टोक्स इन्हेलर वापरताना दिसला. नवी दिल्ली इथं संघाचा सामना झाला तेव्हा हवेतील प्रदूषणाची पातळी ४०० अंशांच्या पार गेली होती. त्यामुळे खेळाडू इथंही इन्हेलर वापरताना दिसले. मुंबईत अलीकडेच भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली होती. (World Cup 2023)
(हेही वाचा – Ghodbunder Traffic : ‘या’ कारणामुळे 28 नोव्हेंबरपर्यंत घोडबंदर परिसरातील वाहतुकीत बदल)
इंग्लिश संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी अहमदाबाद इथं आहेत आणि इथली हवेची शुद्धता त्या मानाने चांगली असल्याचं आय वृत्तपत्राने नमूद केलं आहे. जिथे प्रदूषणाचा प्रश्न येतो तिथेच खेळाडू इन्हेलर वापरत असल्याचं बातमीत म्हटलं आहे. (World Cup 2023)
काही दिवसांपूर्वी इंग्लिश संघ मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. तेव्हाही जो रुटला प्रदूषणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याने प्रदूषित हवा हे पराभवाचं कारण नसल्याचं आधी स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर बोलताना तो म्हणला, ‘असं वातावरण होतं की, मी श्वासच घेऊ शकत नव्हतो. काहीतरी वेगळंच होतं ते. अशा वातावरणात रात्री दृश्यताही कमी होते.’ पुढे तो असंही म्हणला की, असा अनुभव मी पूर्वी कधी घेतला नव्हता. (World Cup 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community