World Cup 2023 Final : म्हणून रोहितला जिंकायचा आहे द्रविडसाठी वर्ल्ड कप

154
World Cup 2023 Final : म्हणून रोहितला जिंकायचा आहे द्रविडसाठी वर्ल्ड कप

भारताचे मुख्य प्रशिक्षक (World Cup 2023 Final) राहुल द्रविड हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकूण चार वर्ल्ड कप खेळले. त्यामधील एका सामन्यात त्यांनी कर्णधाराची भूमिका बजावली होती. मात्र या चारही वेळी विश्वचषकाने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे भारताने आजचा वर्ल्ड कप जिंकला तर 1983 मध्ये पी. आर. मानसिंग यांच्यानंतर भारतीय संघासह विश्वचषक (World Cup 2023 Final) जिंकणारे ते पहिले भारतीय प्रशिक्षक होऊ शकतात. म्हणूनच भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला हा वर्ल्ड कप राहुल द्रविड साठी जिंकून आणायचा आहे.

अशातच राहुल द्रविड (World Cup 2023 Final) यांचा प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाशी (World Cup 2023 Final) असलेला करार विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी संपणार आहे. 2011 मध्ये मायदेशात कप उंचावणाऱ्या एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचे प्रशिक्षक असलेले गॅरी कर्स्टन यांच्या बाबतीतही असेच घडले होते. त्यामुळे आता गॅरी कर्स्टन नंतर राहुल द्रविड देखील वर्ल्ड कप जिंकून आपला करार संपवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये पण टाय झाला तर?)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी (World Cup 2023 Final) भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले की, 2021 च्या विश्वचषकातील पराभवापासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम आणि टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी संघाच्या परिवर्तनात राहुल द्रविड यांनी मोठी भूमिका बजावली आहे. (World Cup 2023 Final)

(हेही वाचा – World Cup 2023 Final : भारताविरुद्ध कांगारूंचे ‘हे ७ शिलेदार’ ठरू शकतात भारी)

पुढे बोलताना रोहित शर्माने सांगितले की, “राहुल द्रविड यांची खेळण्याची पद्धत आणि माझ्या (World Cup 2023 Final) खेळण्याच्या पद्धतीमध्ये खूप फरक आहे. मात्र त्यांनी आम्हाला आमच्या पद्धतीनुसार खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तसेच खेळाडूंना आकार देण्यात द्रविड यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे आमच्या प्रशिक्षकाला भेट म्हणून आम्हाला ही वर्ल्ड कपची ट्रॉफी (World Cup 2023 Final) जिंकायचीच आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.