पुढच्या वर्षी भारतात होणारा वर्ल्ड कप रद्द होण्याची शक्यता, काय आहे कारण?

113

सर्व क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट बघत असतात तो बहुप्रतिक्षित क्रिकेट वर्ल्ड कप 2023 भारतात आयोजित करण्यात आला आहे. पण हाच वर्ल्ड कप आता रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे 2023 चा वर्ल्ड कप भारताऐवजी इतर देशांत खेळवण्याचा निर्णय ICC कडून घेण्यात येऊ शकतो, असे बोलले जात आहे.

करवाढीचा बसणार फटका?

नुकताच केंद्र सरकारकडून क्रीडा स्पर्धांवर लावण्यात येणारा कर वाढवण्यात आला आहे. हा कर 10 टक्क्यांवरुन थेट 21 टक्के इतका वाढवण्यात आल्यामुळे आयसीसीची डोकेदुखी वाढली आहे. कारण मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 2023 साली भारतातील सर्व वर्ल्ड कप मॅचेसमध्ये होणा-या नफ्यातला 21 टक्के कर सरकारला द्यावा लागणार आहे.

(हेही वाचाः Work from Home करायचंय? मग केंद्र सरकारने दिलीय आनंदाची बातमी)

वर्ल्ड कप सामन्यांतून आयसीसीला तब्बल 4 हजार कोटी रुपयांचा नफा होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारने वाढवलेल्या करांमुळे आयसीसीला 840 कोटी रुपये कर स्वरुपात सरकारला द्यावे लागणार आहेत. त्यामुळेच आयसीसीकडून हा वर्ल्ड कप दुस-या देशात भरवू शकतो.

आयसीसीला कमी फायदा

भारतातील वर्ल्ड कप मॅचच्या प्रसारणाचे सर्व हक्क हे स्टार स्पोर्ट्सने घेतले आहेत. त्यामुळे हा कर स्टार स्पोर्ट्सकडून भरला जाईल, असे सांगतिले जात आहे. पण जर स्टार स्पोर्ट्सने हा कर भरला तर आयसीसीला स्टार स्पोर्ट्सकडून कराची किंमत वजा करुन देण्यात येईल. त्यामुळे आयसीसीच्या तिजोरीत कमी पैसे पडणार आहेत.

(हेही वाचाः सुवर्णसंधी! केंद्र सरकार करणार 10 लाख जागांवर भरती, संसदेत केली घोषणा)

पण ही रक्कम आयसीसी बीसीसीआयकडून मागू शकते. या करामुळे भारतात होणा-या वर्ल्ड कपच्या मार्गात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.