World Cup 2023 : ठरलं तर मग! भारत – पाकिस्तान सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार

भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत विश्वचषकाचा थरार अनुभवता येणार आहे.

225
World Cup 2023 : ठरलं तर मग! भारत - पाकिस्तान सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार

गेल्या कित्येक दिवसांपासून क्रिकेट प्रेमींना विश्वचषकाच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. विशेष म्हणजे या वर्ल्ड कपमधील भारत पाकिस्तान सामना नक्की कुठे खेळला जाणार हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक होते. आज म्हणजेच मंगळवार २७ जून रोजी अखेर आयसीसी कडून वर्ल्ड कप २०२३ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आयसीसीने एक पत्रकार परिषद घेऊन हे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत विश्वचषकाचा थरार अनुभवता येणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. कोलकाता आणि मुंबई येथे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, तर अहमदाबाद येथे फायनल होणार आहे.

(हेही वाचा – “संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदुंचा सहभाग”, प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया)

ऑक्टोबर १५ रोजी भारत पाकिस्तान यांच्यात थरार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना हा १५ ऑक्टोबर रोजी होणार असून नरेंद्र मोदी स्टेडिअवर हा थरार रंगणार आहे. या सामन्याला एक लाख प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानने अहमदाबाद येथे सामना खेळण्यास नकार दिला होता, मात्र आयसीसीने आणि बीसीसीआयने पाकिस्तानला या निर्णयामुळे धक्का दिला आहे.

इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात

वनडे विश्वचषकाची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होणार असून गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या मैदानात विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे.

New Project 2023 06 27T125606.260

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.