विश्वचषकासाठी (World Cup 2023) खेळणाऱ्या १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा आज म्हणजेच मंगळवार ५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली.
भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत विश्वचषकाचा (World Cup 2023) थरार अनुभवता येणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. कोलकाता आणि मुंबई येथे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, तर अहमदाबाद येथे फायनल होणार आहे.
(हेही वाचा – IND Vs NEP : भारताचा नेपाळवर १० विकेट्सने विजय; भारताचा सुपर ४ मध्ये प्रवेश)
‘या’ खेळाडूंचा समावेश
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, (World Cup 2023) श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
BREAKING: India announce their 15 for World Cup#CWC23 #cricket pic.twitter.com/b2snYHkwsu
— Cricbuzz (@cricbuzz) September 5, 2023
आशिया चषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या १८ पैकी १५ खेळाडूंची निवड
श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया चषकासाठी निवडलेल्या भारताच्या संघातील (World Cup 2023) १८ सदस्यांपैकी १५ खेळाडूंनी विश्वचषक संघात स्थान मिळवले आहे. तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि आशिया चषक संघात असलेले संजू सॅमसन यांना विश्वचषक संघात स्थान मिळवता आलेले नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community