World Cup 2023 : शुभमन गिलला डेंग्यूची शक्यता; जाणून घ्या कोण खेळणार त्याच्या जागी

135
World Cup 2023 : शुभमन गिलला डेंग्यूची शक्यता; जाणून घ्या कोण खेळणार त्याच्या जागी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यापूर्वी भारतीय संघाची (World Cup 2023) चिंता वाढणार आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार गिलला डेंग्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे शुभमन गिल आता संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) खेळू शकेल की नाही हे ठामपणे सांगता येत नाही आहे. मात्र ८ तारखेला होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात मात्र शुभमन गिल हा मैदानावर दिसणार नाही. त्यामुळे आता भारतीय संघाची चिंता वाढली आहे. गिलच्या गैरहजेरीत ईशान किशन हा सलामीला येण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून शुभमन गिलला (World Cup 2023) ताप येत आहे. त्याची आज म्हणजेच शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी डेंग्यूची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर तो हा वर्ल्ड कप खेळू शकेल की नाही याचा निर्णय होईल.

(हेही वाचा – World Cup 2023 : वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात रूटने मोडला भारताच्या दिग्गज कर्णधाराचा विक्रम)

“चेन्नईत उतरल्यापासून शुभमनला खूप ताप आला आहे. त्याच्या चाचण्या केल्या जात आहेत. शुक्रवारी (World Cup 2023) त्याच्या चाचण्या केल्या जातील आणि सलामीच्या सामन्यात त्याच्या सहभागाबद्दल निर्णय घेतला जाईल “, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे.

तसेच “आपण लगेच कोणत्याही निर्णयावर पोहोचायची गरज नाही, शुभमन गिलचा (World Cup 2023) हा ताप जर सामान्य ताप असेल तर तो औषधं घेऊन सामने खेळू शकतो मात्र हा पूर्णपणे वैद्यकीय टीमचा निर्णय असेल”, असे सूत्रांनी सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.