World Cup 2023 SL vs NED : श्रीलंकेने सामना जिंकला मात्र नेदरलँडनी मनं जिंकली

105
World Cup 2023 SL vs NED : श्रीलंकेने सामना जिंकला मात्र नेदरलँडनी मनं जिंकली

सलग तीन पराभवानंतर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील (World Cup 2023 SL vs NED) आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने उतरलेल्या श्रीलंका संघाला यश आले. नेदरलँड्सविरुद्ध त्यांनी दणदणीत विजय मिळवून गुणांचे खाते उघडले. श्रीलंकेसमोर 263 धावांचे लक्ष्य होते. श्रीलंकेच्या संघाने 48.2 षटकात 5 विकेट गमावत 263 धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेच्या विजयाची हिरो सादिरा समरविक्रमा ठरला. सदीरा समरविक्रमा 107 चेंडूत 91 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. नेदरलँडसाठी आर्यन दत्त हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. आर्यन दत्तने 10 षटकांत 44 धावांत 3 खेळाडू बाद केले. याशिवाय पॉल वॉन मीकेरेन आणि कॉलिन अकरमन यांना 1-1 असे यश मिळाले. तत्पूर्वी, नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

कसून रंजिथा व दिलशान मधुशंका यांच्या उल्लेखनीय गोलंदाजीनंतर फलंदाजीत पथूम निसंका, सदीरा समरविक्रमा आणि चरिथ असलंका यांनी बहारदार खेळ केला. 2007 नंतर वर्ल्ड कप सामन्यात श्रीलंकेच्या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. (World Cup 2023 SL vs NED)

(हेही वाचा – Delhi Murder : दिल्ली पुन्हा हादरली; स्वित्झर्लंडहून बॉयफ्रेंडला भेटायला आलेल्या महिलेची हत्या)

दुसरीकडे, वर्ल्डकप (World Cup 2023 SL vs NED) कोणीही जिंकेल पण नेदरलँडची कामगिरी निश्चितच उजवी झाली आहे. मागील सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला तगडा हादरा दिल्यानंतर आजही त्यांनी बाजी पलटवत श्रीलंकेविरुद्धही दमदार कामगिरी केली. नेदरलँडने श्रीलंकेसमोर 263 धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेदरलँडचा संघ 49.4 षटकांत सर्वबाद 262 धावांवर आटोपला. मात्र, एकवेळ 6 फलंदाज 91 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते, मात्र असे असतानाही संघाला 262 धावांपर्यंत मजल मारली.

विश्वचषकाच्या (World Cup 2023 SL vs NED) इतिहासातील नेदरलँड्सची ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. नेदरलँड्ससाठी एंजेलब्रँडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 82 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. व्हॅन विकने 75 चेंडूत 59 धावांचे योगदान दिले. याशिवाय अकरमनने 32 चेंडूत 29 धावा केल्या. मात्र, नेदरलँडच्या बहुतांश फलंदाजांनी निराशा केली. नेदरलँड संघाच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.