Australia Injury Update : विश्वचषकासाठी संघ मोठा हवा असं पॅट कमिन्सला का वाटतं?

ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा सामना इंग्लंड विरुद्ध शनिवारी होणार आहे. पण, त्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श हे महत्त्वाचे अष्टपैलू खेळाडू खेळू शकणार नाहीएत. त्यामुळेच कर्णधार पॅट कमिन्सला वाटतंय की संघात १५ पेक्षा जास्त खेळाडू असायला हवेत.

129
IPL 2024 Pat Cummins : पॅट कमिन्सने दिलेल्या ‘या’ उत्तराने भारतीयांच्या जखमेवर चोळलं मीठ
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा सामना इंग्लंड विरुद्ध शनिवारी होणार आहे. पण, त्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श हे महत्त्वाचे अष्टपैलू खेळाडू खेळू शकणार नाहीएत. त्यामुळेच कर्णधार पॅट कमिन्सला वाटतंय की संघात १५ पेक्षा जास्त खेळाडू असायला हवेत. (Australia Injury Update)

विश्वचषक स्पर्धेसाठी प्रत्येक संघात १५ खेळाडू निवडण्याची मुभा आयसीसीने दिली आहे. पण, आता जवळ जवळ सगळेच कर्णधार ही संख्या वाढून १७ किंवा १८ करावी अशी मागणी करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी हेच बोलून दाखवलं. (Australia Injury Update)

भारतासारख्या खंडप्राय देशात करावा लागणारा सततचा प्रवास आणि दोन महिने लांबीची इतकी मोठी स्पर्धा याचा विचार करून संघ निवडीसाठी जास्त पर्याय कर्णधारासमोर असावेत असा हा विचार आहे. न्यूझीलंड संघाने अलीकडेच मॅट हेन्री हा खेळाडू दुखापतीमुळे गमावला. त्यांच्या लॉकी फर्ग्युसन आणि जिमी निशमटू या आणखी दोघा खेळाडूंना दुखापत झालीय. याचा परिणाम संघाच्या निकालांवरही झाला आहे. (Australia Injury Update)

तेच आता ऑस्ट्रेलियाच्या बाबतीतही घडतंय. याच आठवड्यात त्यांचे ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श हे दोन खेळाडू अनुपलब्ध झालेत आणि त्यामुळे अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना कर्णधार पॅट कमिन्ससमोर अडचणींचा डोंगर आहे. हा प्रश्न सामन्या आधीच्या पत्रकार परिषदेत कमिन्सला विचारण्यात आला. (Australia Injury Update)

‘दोन महिने चालणारी ही स्पर्धा आहे आणि अशावेळी न्यूझीलंड संघावर आली तशी वेळ कुणावरही येऊ शकते आणि तसं झालं तर क्रिकेट किंवा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेवर त्याचा विपरित परिणाम होणार. सामने पूर्ण ताकदीनिशी खेळले जाऊ शकत नाहीत,’ असं आपली बाजू मांडताना कमिन्स म्हणाला. (Australia Injury Update)

(हेही वाचा – Air Pollution In Mumbai : महापालिका भाडेतत्वावर घेणार धूळ प्रतिबंधक यंत्रे)

मॅक्सवेलने नुकतीच नेदरलँड्स विरुद्ध ४० चेंडूत १०३ धावांची खेळी खेळली होती. तर मार्शच्या नावावरही एक शतक आहे. आणि हेच दोन खेळाडू नेमके पुढील सामन्यात खेळू शकणार नाहीएत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ विवंचनेत आहे हे नक्की. पण, त्याचवेळी इंग्लंड विरुद्ध पूर्ण तंदुरुस्त असलेले १३ खेळाडू उपलब्ध आहेत, हे सांगायलाही कमिन्स विसरला नाही. (Australia Injury Update)

‘नशिबाने मॅक्सवेल आणि मार्शचे पर्याय संघात उपलब्ध आहेत. अंतिम अकरा जणांचा संघ आम्ही नाणेफेकीच्या वेळी जाहीर करू. मॅक्सवेल शेवटच्या साखळी सामन्यासाठी संघात परत येईल असं मला वाटतं. मार्शबद्दल मात्र अजून स्पष्टता नाही,’ असं कमिन्सने सांगितलं. (Australia Injury Update)

ऑस्ट्रेलियन संघ सध्या ७ सामन्यांमध्ये ८ गुण मिळवून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. पण, उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की करण्यासाठी संघाला पुढील दोन्ही सामने जिंकणं आवश्यक आहे. (Australia Injury Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.