World Cup Final Ind vs Aus : साखळी सामन्यात जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताची अवस्था ३ बाद २ अशी केली होती

अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ रविवारी आमने सामने येतील. अशावेळी बघूया या संघांदरम्यानच्या साखळी लढतीच्या वेळी नेमकं काय घडलं होतं?

141
World Cup Final Ind vs Aus : साखळी सामन्यात जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताची अवस्था ३ बाद २ अशी केली होती
World Cup Final Ind vs Aus : साखळी सामन्यात जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताची अवस्था ३ बाद २ अशी केली होती
  • ऋजुता लुकतुके

अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ रविवारी आमने सामने येतील. अशावेळी बघूया या संघांदरम्यानच्या साखळी लढतीच्या वेळी नेमकं काय घडलं होतं? (World Cup Final Ind vs Aus)

न्यूझीलंड संघाने तोपर्यंत उद्घाटनाच्याच सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारलेली होती. तर शेजारी पाकिस्तानच्या संघानेही विश्वचषक मोहिमेची सुरुवात शैलीदार विजयाने केली होती. अशावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ८ ऑक्टोबर २०२३ ला चेन्नईला आमने सामने आले. (World Cup Final Ind vs Aus)

बीसीसीआयने ऐनवेळी उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला होता. सुरुवातीच्या सामन्यांना प्रेक्षकांची म्हणावी तशी गर्दी नव्हती. आणि अशावेळी चेन्नईच्या विलक्षण उकाड्यात चिदंबरम स्टेडिअमवरही भारताचा सामना असताना सुरुवातीला फारशी गर्दी नव्हती. खेळपट्टी भारताला साजेशी म्हणजे फिरकीला साथ देणारी असणार असं आधीपासूनच बोललं जात होतं. सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाल्यामुळे तो हा सामना खेळणार नव्हता आणि त्याच्या जागी ईशान किशन खेळणार हे संघ प्रशासनाने आधीच जाहीर केलं होतं. (World Cup Final Ind vs Aus)

आता प्रश्न होता वळणारी खेळपट्टी बघून घरच्या मैदानावर अश्विनला संधी मिळते का? पण, ती मिळाली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. खेळपट्टीवर खरंच सुरुवातीपासून चेंडू वळत होता आणि बुमरा अतिशय अचूक गोलंदाजी करत होता. मिचेल मार्शला त्याने शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आणि त्यानंतर मात्र स्टिव्ह स्मिथ आणि वॉर्नर ही जोडी फोडण्यासाठी रोहितला फिरकी पणाला लावावी लागली. (World Cup Final Ind vs Aus)

पण, खेळपट्टी खरंच वळत होती आणि अश्विन, कुलदीप आणि जाडेजा या तिघांनी टिच्चून ३० षटकं टाकली आणि यात चार बळीही घेतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांची मात्रा चेन्नईत चालली नाही आणि पन्नासाव्या षटकात १९९ धावा करून ऑस्ट्रेलियन संघ बाद झाला. जाडेजाने ३, बुमरा आणि कुलदीपने प्रत्येकी २ तर बाकींच्यांनी एकेक गडी बाद केला. (World Cup Final Ind vs Aus)

भारतासमोर आव्हान होतं ते २०० धावांचं, म्हणजे तसं आटोक्यातील आव्हान होतं. पण, भरवशाच्या लोकांनीच घात केला. रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर हे आघाडीचे तीन फलंदाज चक्क शून्यावर बाद झाले आणि भारतीय संघाची अवस्था ३ बाद २ अशी बिकट झाली. हे कमी म्हणून की काय, विराटचा एक सोपा झेल मार्शने सोडला. (World Cup Final Ind vs Aus)

(हेही वाचा – Share Market : टाटा टेक्नॉलॉजीजच्या पहिल्या आयपीओची घोषणा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी)

भारतीय संघाची अवस्था पहिल्या सामन्यातच बिकट झाली होती. संघाच्या मधल्या फळीचा पहिल्याच सामन्यात कस लागला आणि या परीक्षेला के एल राहुल आणि विराट कोहली खरे उतरले. दोघांनी १६४ धावांची भागिदारी केली. यात विराटने ८५ धावा केल्या त्या ८ चौकारांनिशी. बऱ्याच दिवसांनी विराटला सूर गवसला होता आणि दुखापतीनंतर पुनरागमन करणारा के एल राहुल मध्ये काही घडलंच नसल्यासारखी फलंदाजी करत होता. (World Cup Final Ind vs Aus)

विराट बाद झाला. पण, राहुलने शेवटपर्यंत टिकून राहत नाबाद ९७ धावा केल्या आणि शेवटी ४२ व्या षटकांतच भारताने ऑस्ट्रेलियाचं आव्हान ६ गडी राखून परतवून लावलं. ऑस्ट्रेलियासारखी तगडी फलंदाजांची फळी दोनशेच्या आत गुंडाळणं आणि खराब सुरुवातीनंतरही हार न मानता हे आव्हान पूर्ण करणं या गोष्टी भारतीय संघाने या सामन्यातून साध्य केल्या. आणि विराट कोहलीला हरवलेलं सातत्य मिळालं जे तो स्पर्धेत शेवटपर्यंत टिकवून आहे. (World Cup Final Ind vs Aus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.