Eng vs Ned : इंग्लिश फलंदाज जो रुट जेव्हा एका विचित्र फटक्यावर बाद झाला

चांगली सुरुवात करून मोठ्या धावसंख्येच्या तयारीत असलेल्या इंग्लिश संघाला पुण्यात एक धक्का बसला जेव्हा जो रुट एक विचित्र फटका खेळून बाद झाला. १७० धावांतच संघाचे ४ फलंदाज परतले. पुढे बेन स्टोक्सने शतक करून संघाला मोठी धावसंख्या रचून दिली. पण, आधी जो रुट कसा बाद झाला ते बघूया…

123
Eng vs Ned : इंग्लिश फलंदाज जो रुट जेव्हा एका विचित्र फटक्यावर बाद झाला
Eng vs Ned : इंग्लिश फलंदाज जो रुट जेव्हा एका विचित्र फटक्यावर बाद झाला
  • ऋजुता लुकतुके

चांगली सुरुवात करून मोठ्या धावसंख्येच्या तयारीत असलेल्या इंग्लिश संघाला पुण्यात एक धक्का बसला जेव्हा जो रुट एक विचित्र फटका खेळून बाद झाला. १७० धावांतच संघाचे ४ फलंदाज परतले. पुढे बेन स्टोक्सने शतक करून संघाला मोठी धावसंख्या रचून दिली. पण, आधी जो रुट कसा बाद झाला ते बघूया… (Eng vs Ned)

पुण्यात नेदरलँड्स विरुद्ध इंग्लिश संघाने मोठा विजय मिळवून निदान गुणतालिकेतील तळाचं स्थान मागे टाकलं असलं, तरी या सामन्यात आघाडीचा फलंदाज जो रुट ज्या पद्धतीने बाद झाला त्याची चर्चा काही दिवस होत राहील. आपल्या आधीच्या ४ षटकांत ४५ धावा देणाऱ्या लोगन व्हॅन बीकच्या एका चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना रुटचे सर्व अंदाज चुकले. (Eng vs Ned)

२१ व्या षटकांत तेव्हा इंग्लिश संघ एक बाद १३२ अशा सुस्थितीत होता. जच कर्णधार एडवर्ड्सने तेज गोलंदाज लोगन व्हॅन बीकला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं. अचूक टप्प्यावर टाकलेला बीकचा चेंडू रुटला अपेक्षा होती तितका उसळला नाही. आणि रूट थर्ड मॅनच्या दिशेनं रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायला गेला. पण, पूर्णपणे चकला आणि चेंडू त्याच्या पायातून थेट यष्टीवर आदळला. (Eng vs Ned)

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(हेही वाचा – NZ vs Sri : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट, पावसाचा फायदा पाकिस्तानला मिळेल का?)

हा चेंडू खेळताना त्याची पूर्णपणे तारांबळ उडालेली दिसली. रुट आणि मलान यांनी तोपर्यंत ८५ धावांची भागिदारी केली होती आणि महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेत शेवटच्या ५ सामन्यांत २९ धावा केलेला जो रुट जम बसून खेळत होता. इंग्लंडची आगेकूच मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं सुरू होती. (Eng vs Ned)

पण, हा विचित्र फटका खेळून जो रुट बाद झाला आणि पुढे इंग्लंडची अवस्थाही १६७ वर ४ गडी बाद अशी झाली होती. अखेर बेन स्टोक्सने संघाचा डाव सावरत शतक झळकावलं आणि धावसंख्या ३३० च्या वर नेली. (Eng vs Ned)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.