World Rapid & Blitz Chess World Cup : जलदगती बुद्धिबळाच्या विश्वचषकात जगज्जेता डी गुकेश का खेळत नाही?

World Rapid & Blitz Chess World Cup : नुकत्याच संपलेल्या जगज्जेतेपदानंतर तो विश्रांती घेत आहे.

45
World Rapid & Blitz Chess World Cup : जलदगती बुद्धिबळाच्या विश्वचषकात जगज्जेता डी गुकेश का खेळत नाही?
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या डी गुकेशने अलीकडेच बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनला हरवून पराक्रम केला आहे. १९ वर्षं आणि १६५ दिवसांचा गुकेश जगातील सगळ्यात तरूण जगज्जेता ठरला आहे. पण, अमेरिकेत सुरू झालेल्या रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ विश्वचषकात तो खेळत नाहीए. २६ डिसेंबर पासून ही प्रतीष्ठेची बुद्धिबळ स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये सुरू झाली आहे. भारताकडून अर्जुन एरिगसी, प्रग्यानंदा, विदिथ गुजराथी असे सगळे युवा खेळाडू खेळणार आहेत. पण, गुकेशने या स्पर्धेतून विश्रांती घेणं पसंत केलं आहे. (World Rapid & Blitz Chess World Cup)

(हेही वाचा – Uttar Pradesh मध्ये गोरक्षकांनी केली १०० गाईंची तस्करांच्या तावडीतून सुटका)

गुकेशची जगज्जेतेपदाची लढत नुकतीच संपली आहे. एका महिन्याच्यावर चाललेल्या १४ आव्हानात्मक लढतींनंतर गुकेशने जगज्जेतेपद पटकावलं. या स्पर्धेसाठी केलेली तयारी आणि डिंग लिरेनसारख्या खेळाडूशी स्पर्धा करताना जाणवणारा तणाव यामुळे गुकेशने हा निर्णय घेतला. (World Rapid & Blitz Chess World Cup)

(हेही वाचा – Air Pollution : मुंबईतील रस्ते ब्रशिंग आणि धुण्यासाठी १०० टँकरसह फौजफाटा सज्ज)

‘सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करणं म्हणजे काय याची ज्यांना कल्पना आहे, त्यांना मागचे सहा महिने मी कशातून गेलोय ते समजू शकेल. सहा महिने मी जगज्जेतेपदाचीच तयारी करत होतो. त्यानंतर महिनाभरात १३ प्रचंड चुरशीच्या लढती झाल्या. त्या खेळल्यानंतर मी आणि माझा प्रतिस्पर्धीही फक्त दोन मृत माणसांसारखे होतो. इतके आम्ही थकलेले होतो. त्यामुळे लगेच दुसरी स्पर्धा खेळणं शक्य नाही,’ असं स्वत: गुकेशने स्पर्धेतून माघार घेताना बोलून दाखवलं आहे. (World Rapid & Blitz Chess World Cup)

(हेही वाचा – Sandeep Naik करणार भाजपामध्ये घरवापसी?)

अर्थात, नवीन वर्षी गुकेश पुन्हा एकदा स्पर्धा खेळताना आपल्याला दिसेल. जानेवारीत होणाऱ्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत तो खेळताना दिसेल. ही स्पर्धा १७ जानेवारीपासून विक आन झी इथं होणार आहे. गुकेशच्या अनुपस्थितीत रॅपिड विश्वचषक स्पर्धेत भारताची मदार अर्जुन एरिगसी आणि प्रग्यानंदावर असेल. अर्जुन सध्या क्रमवारीतील भारताचा अव्वल बुद्धिबळपटू आहे. नुकतच त्याने २,८०० एलो रेटिंग गुण पार करून क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विश्वनाथन आनंदनंतर २,८०० गुणांचा टप्पा गाठणारा अर्जुन दुसरा भारतीय खेळाडू आहे. मॅग्नस कार्लसन, फाबियानो कारुआना, नाकामुरा आणि अलीरेझा फिरोझा हे अव्वल बुद्धिबळपटू या स्पर्धेत खेळत आहेत. (World Rapid & Blitz Chess World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.