-
ऋजुता लुकतुके
२०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेचे २० संघ आता ठरले आहेत. जाणून घेऊया स्पर्धेचा फॉरमॅट. (World T20 2024)
गुरुवारी उशिरा युगांडा क्रिकेट संघाने रवांडाचा पराभव करून वर्ल्ड टी-२० स्पर्धेत प्रवेश मिळवला आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे २० संघही निश्चित झाले. आफ्रिका खंडातून नामिबिया आणि युगांडा या दोन संघांनी मुख्य स्पर्धेत स्थान मिळवलं आहे. तर ऑस्ट्रेलिया खंडातून पापुआ न्यू जिनी हा संघ आधीच पात्र ठरला आहे. अमेरिकेला यजमान पदाच्या जोरावर ही स्पर्धा खेळता येणार आहे. (World T20 2024)
२०२४ वर्ल्ड टी-२० ची वैशिष्ट्ये
- पहिल्यांदाच आयसीसी मान्यताप्राप्त स्पर्धेत २० संघ खेळणार आहेत. यापूर्वी जास्तीत जास्त १६ संघ एका स्पर्धेत खेळले होते. सुरुवातीला गटवार साखळी आणि मग बाद फेरीचे तीन सामने असं आता स्पर्धेचं स्वरुप असेल.
- अमेरिकेत पहिल्यांदाच आयसीसीची क्रिकेट स्पर्धा होते आहे. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचे दोन टी-२० सामने अमेरिकेत फ्लोरिडा इथं खेळवण्यात आले होते. पण, यावेळी वेस्ट इंडिजच्या बरोबरीने जवळ जवळ निम्मे सामने अमेरिकेत होणार आहेत. फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया इथं चार मैदानं या स्पर्धेसाठी तयार करण्यात येत आहेत. दोन स्टेडिअम तर खास क्रिकेटसाठी बांधण्यात येत आहेत. (World T20 2024)
स्पर्धेत पात्र ठरलेले २० संघ बघूया…
भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, बांगलादेश, द आफ्रिका, अफगाणिस्तान, नेदरलँड्स, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, पापुआ न्यू जिनी, नामिबिया, युगांडा, कॅनडा, अमेरिका व वेस्ट इंडिज (World T20 2024)
Presenting the 2⃣0⃣ teams that will battle for ICC Men’s #T20WorldCup 2024 🏆
✍: https://t.co/Oqz5IqMMV4 pic.twitter.com/PdPo5r8Zf4
— T20 World Cup (@T20WorldCup) November 30, 2023
२० संघांच्या समावेशामुळे आता स्पर्धेचा फॉरमॅटही बदलावा लागला आहे. नवीन फॉरमॅटमध्ये आधी गटवार साखळी आणि मग बाद फेरीचे सामने होतील. (World T20 2024)
(हेही वाचा – National OBC Women’s Federation : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे दुसरे अधिवेशन नागपूरला )
वर्ल्ड टी-२० स्पर्धेचा नवा फॉरमॅट
या २० संघांची विभागणी प्रत्येकी ५ संघ अशी चार गटांत करण्यात येईल. प्रत्येक गटात साखळी स्पर्धा पार पडेल आणि गटातील दोन अव्वल संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. चार गटांतून प्रत्येकी २ संघ मिळून सुपर एट हा गट तयार होईल.
सुपर एट संघांना पुन्हा दोन गटांमध्ये विभागण्यात येईल आणि त्यांचे गटवार साखळी सामने पार पडतील. सुपर एट दोन गटातून प्रत्येकी दोन अव्वल संघ बाद फेरी गाठतील आणि पुढे दोन उपांत्य सामने आणि एक अंतिम सामना पार पडेल. तिसरा क्रमांक ठरवण्यासाठीही एक सामना होईल. (World T20 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community