दक्षिण कोरियात २१ ते २४ एप्रिल या दरम्यान होणाऱ्या विश्व तायक्वाँदो पुमासे प्रतियोगिता यात ६० वर्षाखालील पुरुष एकेरी सादरीकरण गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्याकरिता सावरकर तायक्वाँदो अकॅडमीचे प्रशिक्षक राजेश खिलारी यांची निवड झाली आहे.
औरंगाबाद येथे २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान विश्व तायक्वाँदो पुमासे प्रतियोगितेसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी खिलारी यांची निवड करण्यात आली. दक्षिण कोरियातील या स्पर्धेसाठी ३५ खेळाडू आणि ५ अधिकारी अशा भारतीय संघाने रविवारी रात्री दक्षिण कोरियाला प्रस्थान केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी खिलारी आणि भारतीय संघाला शुभेच्छा देऊन देशासाठी गौरवास्पद कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
(हेही वाचा मुस्लिम कार्यकर्त्यांकडूनच राज यांच्या भोंग्यांवरील भूमिकेला समर्थन)
Join Our WhatsApp Community