- ऋजुता लुकतुके
मेलबर्न कसोटीत चहापानाला ३ बाद ११२ अशी अवस्था असताना चहापानानंतर भारतीय डाव गडगडला आणि उर्वरित ७ बळी ४३ धावांत गेले. अखेर भारताचा १८४ धावांनी पराभव झाला. कसोटी अनिर्णित राखण्यासाठी भारतीय फलंदाजांना उर्वरित ५० षटकं खेळून काढायची होती. पण, ते फलंदाजांना जमलं नाही. या पराभवानंतर भारतीय संघ मालिकेत १-२ असा पिछाडीवर गेला आहे आणि त्यातच आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही संघाची पिछेहाट सुरूच आहे. (World Test Championship)
(हेही वाचा – न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत बदल होणार; SC Collegeum मोठा निर्णय घेणार)
मेलबर्नमधील विजयासह ऑस्ट्रेलियन संघाची यशाची टक्केवारी ६१.४६ इतकी झाली आहे आणि ते क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत. इथून पुढे सिडनी कसोटी त्यांनी भारताबरोबर गमावली, तरी त्यांचे ५७.८४ टक्के गुण होतील आणि भारत ५५.२६ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावरच राहील. रविवारी पाकिस्तानविरुद्ध २ गडी राखून मिळवलेल्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकन संघ ६६.६७ टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहेत आणि त्यांनी अंतिम फेरीतील आपला प्रवेश नक्की केला आहे.
आता दुसऱ्या स्थानावर जायचं असेल भारताला उर्वरित सिडनी कसोटी जिंकण्याबरोबरच श्रीलंकेचीही मदत लागेल. आधी सध्याचे गुण बघूया, (World Test Championship)
भारतीय संघाने मालिकेतील उर्वरित सिडनी कसोटी जिंकली आणि बोर्डर-गावस्कर मालिका बरोबरीत सोडवली. त्याचवेळी श्रीलंकेनं आगामी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-० असं हरवलं, तर आणि तरंच भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठता येईल.
याउलट ऑस्ट्रेलियन संघाने सिडनी कसोटी जिंकून बोर्डर-गावस्कर मालिका ३-१ ने जिंकली तर मालिकेनंतर ६३.७३ अशा विजयाच्या टक्केवारीसह ते अंतिम फेरीत पोहोचतील आणि पुढील वर्षी जून महिन्यात लॉर्ड्सवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा मुकाबला रंगेल. (World Test Championship)
(हेही वाचा – Sion Panvel Highway आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर डीप क्लीनिंग मोहीम; प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना)
जून महिन्यात झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर गौतम गंभीर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले. तेव्हा भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल होता आणि पुढील दोन महिन्यात बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकून भारतीय संघाने अजिंक्यपदाच्या शर्यतीत आपलं स्थान भक्कम केलं होतं. पण, दिवाळीत न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारतीय संघाचा ०-३ असा पराभव झाला आणि तिथपासून भारतीय संघाला एकामागून एक धक्के बसले आहेत.
आता बोर्डर-गावस्कर मालिकेतही भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर आहे आणि यावेळी ही मलिका गमावली तर १० वर्षं आपल्याकडे राखलेला चषक भारतीय संघ गमावणार आहे. शिवाय कसोटी अजिंक्यपदाचं स्वप्नही भारतापासून दूर जाईल. (World Test Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community