वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियाला धक्का! कसोटी संघातून हे ३ दिग्गज खेळाडू बाहेर

158

जूनमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावस्कर मालिकेत पराभूत करून आपली जागा अंतिम सामन्यात निश्चित केली. परंतु वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियाच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. आतापर्यंत टीम इंडियाला ३ धक्के बसले आहेत यामागील सर्वात प्रमुख कारण म्हणजे दुखापतग्रस्त खेळाडू, संघातील स्टार फलंदाज दुखापतीमुळे विश्रांतीवर आहे.

( हेही वाचा : या व्यक्तीने एकट्यानेच निर्माण केला २० फूट खोल तलाव; आता गावात पाण्याची कमतरता नाही )

ओव्हलच्या मैदानावर ७ जूनपासून अंतिम सामना 

आता श्रेयस अय्यर सुद्धा दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळू शकणार नाही. याशिवाय ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह याआधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. त्यामुळे या तिघांची रिप्लेसमेंट म्हणून संघात कोणाचा समावेश होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर ७ जूनपासून दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

दुखापतीचे सावट 

श्रेयस अय्यर संघात असू शकतो अशी चर्चा होती मात्र सर्जरीच्या कारणास्तव तो संपूर्ण आयपीएल हंगाम सुद्धा खेळू शकणार नाही. तर मागील ६ ते ७ महिन्यांपासून बुमराह टीम इंडियापासून दूर आहे त्यामुळे या महत्त्वाच्या खेळाडूंच्या जागी कसोटी संघात कोणाची वर्णी लागणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.