-
ऋजुता लुकतुके
आयसीसीने २०२४-२५ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं अंतिम फेरीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ११ ते १४ जून दरम्यान लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्सवर ही कसोटी रंगणार आहे. एखाद्या आयसीसी स्पर्धेची अंतिम फेरी या मैदानावर होण्याची ही तिसरी खेप आहे. वेळ पडल्यास १५ जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. अंतिम फेरीचा संपूर्ण कार्यक्रम आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ॲलरडाईस यांनी सांगितला. (World Test Championship)
(हेही वाचा- Sharad Pawar on CM Face : शरद पवारांनी फेटाळली उद्धव ठाकरेंची मागणी ; म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा…)
‘कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी अल्पावधीतच क्रिकेट जगतातील सर्वात रोमांचक स्पर्धा बनली आहे. त्यामुळे, २०२५ च्या अंतिम फेरीची तारीख जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धा लोकप्रिय आहे आणि लोक लांबून प्रवास करून अंतिम सामना पाहायला येतात, म्हणून मी लोकांना विनंती करतो की पुढच्या वर्षीच्या सामन्याची तिकिटे बुक करा,’ असं ॲलरडाईस आपल्या निवेदनात म्हणाले. (World Test Championship)
Mark your calendars 🗓️
Dates for the #WTC25 Final are here 👀
Details 👇https://t.co/XkBvnlYIDZ
— ICC (@ICC) September 3, 2024
कसोटी अजिंक्यपदाची पहिली अंतिम फेरी २०२१ मध्ये साउथॅम्प्टन येथे खेळली गेली होती, तर २०२३ च्या विजेतेपदाची लढत ओव्हल मैदानावर झाली होती. आतापर्यंत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे २०२१ आणि २०२३ मध्ये हे विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही वेळा भारताला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. (World Test Championship)
(हेही वाचा- Konkan Railway: खोळंबलेल्या एसटीमुळे कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना मदतीचा हात; आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा)
पहिल्यांदा भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. २०२५ चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. येत्या काही महिन्यांत सर्वच संघ भरपूर कसोटी सामने खेळणार आहेत, त्यानंतर कोणते संघ विजेतेपदाची लढत खेळणार हे निश्चित होईल. (World Test Championship)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community