दिल्लीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताने जिंकल्यामुळे जागतिक कसोटी विश्वचषक स्पर्धेतून दक्षिण आफ्रिका हा संघ बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय झाल्याने टीम इंडिया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याची शक्यताही दाट वाढली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल कोणत्या दोन संघांमध्ये खेळवली जाणार आहे याची शक्यता आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या डबलडेकर बसमधून फक्त ६ रुपयांमध्ये प्रवास! असा असेल मार्ग)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरी या दोन संघांमध्ये होण्याची शक्यता आहे अशी माहिती दिली आहे. WTC ची फायनल जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये होणार आहे. सध्या फक्त तीन संघांना फायनलमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे, असेही ICC ने सांगितले आहे.
ICC ने दिली माहिती
- भारत आणि श्रीलंका यांच्यात फायनल होण्याची शक्यता २.८ टक्के आहे.
- ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप होण्याची शक्यता ८.३ टक्के आहे.
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना होऊ शकतो याची शक्यता ८८.९ टक्के आहे. WTC मध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन कसोटी सामने जिंकणे गरजेचे आहे.